या पोस्टमध्ये आज आपण ब्लॉगर ब्लॉगची थीम कशी बदलावी म्हणजेच how to change theme in blogger in marathi हे जाणून घेणार आहोत . तसे तर ब्लॉगची थीम किंवा टेम्प्लेट बदलणे काही मोठे काम नाही आहे परंतु तुम्ही आत्ताच एक नवीन ब्लॉग बनवला आहे व ब्लॉगिंग क्षेत्रात नवीन आहेत. त्यामुळे तुम्हाला आता छोट्या छोट्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत . थीम हा ब्लॉग वेबसाईट चा एक मुख्य भाग आहे . ज्यावर आपले सगळे कन्टेन्ट हे डिस्प्ले होत असतात.
जेव्हा तुम्ही ब्लॉगर वर फ्री मध्ये ब्लॉग बनवतात तेव्हा तुम्हाला डिफॉल्ट ब्लॉगर थीम वापरण्यासाठी मिळते व ती पूर्णपणे मोफत असते. परंतु ती थीम काही खास नसते व ती थीम responsive सुद्धा नसते responsive चा अर्थ म्हणजे अशी थीम जी सगळ्या डिवाइस मध्ये योग्य प्रकारे फिट होईल . असे समजा की तुम्ही तुमचा ब्लॉग मोबाईल मध्ये ओपन केला आहे . तर तुमची थीम तुमच्या मोबाईलचा स्क्रिन मध्ये पूर्णपणे फिट झाली पाहिजे व वाचकाला त्यामधील पोस्ट वाचण्यासाठी त्रास होऊ नये अशा प्रकारे responsive थीम असते.
जर तुम्हाला सर्वोत्तम ब्लॉगरची थीम कोणत्या आहेत हे जाणून घ्यायचे असेल तर मी त्यासाठी एक वेगळा स्पेशल ब्लॉग लिहण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यामध्ये मी तुम्हाला ब्लॉगर ब्लॉगसाठी असणाऱ्या सर्वोत्तम थीम दाखवण्याचा प्रयत्न करेन.
ब्लॉगर ब्लॉग ची थीम कशी बदलावी ? | How To Change Theme In Blogger In Marathi
ब्लॉगची टेम्प्लेट किंवा थीम बदलण्याचे 2 मार्ग आहेत. थीम डाऊनलोड केल्यानंतर ती थीम extract करण्याची गरज असते व ती फाईल extract केल्यानंतर त्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक XML फाईल मिळते . ती XML फाईल तुम्ही अपलोड करू शकता किंवा ती XML फाईल नोटपॅडमध्ये ओपन करून. त्यामधील पूर्ण कोड कॉपी करून ब्लॉगच्या HTML सेक्शनमध्ये पेस्ट करू शकता. तर चला या दोन्ही मार्गाबद्दल सविस्तर जाणून घेऊया……..
ब्लॉगर ब्लॉग ची थीम HTML द्वारा कशी बदलावी ?
सर्वप्रथम तुम्हाला मी ब्लॉगच्या HTML कोडींग सेक्शन मध्ये कोड पेस्ट करुन थीम चेंज कशी करावी हे दाखवणार आहे.
स्टेप 1 – सर्वप्रथम तुम्ही जी थीम डाऊनलोड केली आहे त्यावर राइट क्लिक करून Extract All वर क्लिक करा. त्यानंतर त्या थीमचा Extract फोल्डर तयार होईल. यामध्ये तुम्हाला थीमची XML फाईल मिळेल व त्या XML फाईल मधील कोडला आपल्याला HTML मध्ये पेस्ट करायचे आहे .
स्टेप 2 – आता तुम्ही ब्लॉगर मध्ये लॉग इन करा व त्यानंतर थीम ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 – व त्यानंतर Customize च्या ड्रॉप-डाऊन बटन वर क्लिक करा व त्यानंतर Edit Html वर क्लिक करा व त्यानंतर तुमच्यासमोर कोडींग सेक्शन ओपन होईल.
स्टेप 4 – आता तुम्हाला Ctrl + A हे दाबून पूर्ण कोडला सिलेक्ट करायचे आहे व त्यानंतर कीबोर्ड मध्ये Delete बटन दाबून पूर्ण कोडला डिलीट करायचे आहे व त्यानंतर त्या जागी तुम्हाला नवीन थीम ची कोडींग पेस्ट करायची आहे .
स्टेप 5 – थीम ची कोडींग कॉपी करण्यासाठी तुम्हाला Extract केलेल्या फोल्डरमध्ये जायचे आहे व त्यानंतर तुम्हाला XML च्या फाईल वर राईट क्लिक करून त्याला नोटपॅडमध्ये ओपन करायचे आहे.
स्टेप 6 – ती फाईल नोटपॅडमध्ये ओपन केल्यानंतर Ctrl + A चा वापर करून थीम सिलेक्ट करायची आहे व त्यानंतर कॉपी करण्यासाठी Ctrl + C चा उपयोग करायचा आहे.
स्टेप 7 – कोड कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत Html सेक्शनमध्ये तो कोड पेस्ट करायचा आहे व त्यानंतर Save बटन वर क्लिक करायचं आहे व यानंतर तुमची थीम यशस्वीरित्या चेंज होईल. व त्यानंतर तुम्ही तुमचा ब्लॉग ओपन करून बघू शकता की थीम चेंज झाली आहे की नाही.
थीम फाईल अपलोड करून थीम कशी बदलावी ?
वरती आपण XML मधील कोडींग HTML सेक्शन मध्ये पेस्ट करून थीम चेंज कशी करावी हा मार्ग बघितला . आता आपण डायरेक्ट एक साधी फाईल अपलोड करून थीम कशी चेंज करायची हे बघणार आहोत . सर्वप्रथम तुम्हाला ब्लॉगर मध्ये लॉगिन करायचे आहे . त्यानंतर थीम वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत Customize च्या ड्रॉप-डाऊन मेन्यू वर क्लिक करायचे आहे व त्यानंतर Restore या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक पॉपअप ओपन होईल . त्यामध्ये तुम्हाला अपलोड बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर Extract फोल्डर मध्ये जाऊन XML फाईल ला सिलेक्ट करुन ओपन बटन वर क्लिक करायचे आहे . काही क्षणातच तुमची थीम अपलोड होईल व यानंतर तुम्ही ब्लॉग रिफ्रेश करून बघू शकता.
आपण ब्लॉगर ब्लॉगची थीम कशी बदलावी यासाठी 2 मार्ग सविस्तर जाणून घेतले आहेत. परंतु कधीकधी थिम चेंज करत असताना जेव्हा तुम्ही फाईल अपलोड करतात तेव्हा Error सुद्धा येऊ शकतो . परंतु टेन्शन घेण्याचे कारण नाही. तुम्ही पहिला मार्ग अवलंबून म्हणजेच ब्लॉगर मध्ये Html कोड पेस्ट करून तुम्ही यशस्वीरित्या थीम बदलू शकता.
निष्कर्ष
या पोस्टमध्ये आज आपण ब्लॉगर ब्लॉगची थीम कशी बदलावी म्हणजेच how to change theme in blogger in marathi हे जाणून घेतले . तुम्हाला जर या पोस्ट बद्दल किंवा वेबसाईट बद्दल कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.