WordPress मध्ये New User कसा Add करावा ?

 तुम्हाला वर्डप्रेस मध्ये नवीन यूजर कसा जोडावा ? म्हणजेच How To Add New User In WordPress In Marathi हे जाणून घ्यायचे आहे का ? वर्डप्रेस मध्ये आधी पासूनच user management system आहे . त्यामुळे तुम्ही आरामात प्रत्येक यूजरला  वेगळा रोल देऊ शकता जसे की  author , एडिटर , administrator अश्या प्रकारे . 

How To Add New User In WordPress In Marathi

तर चला वर्डप्रेस मध्ये नवीन यूजर कसा जोडावा ? म्हणजेच How To Add New User In WordPress In Marathi हे जाणून घेऊया . तर पहिला यूजर च्या भूमिकेचे प्रकार जाणून घेऊयात ……

वर्डप्रेस मधील यूजर भूमिका चे प्रकार | Types of user role in wordpress in marathi

1. Administrator

Administrator भूमिका असलेला यूजर वर्डप्रेस मध्ये सगळ्या गोष्टी हॅंडल व कंट्रोल करू शकतो . ही भूमिका जर तुम्ही कोणाला देत असाल तर तो माणूस तुमच्या विश्वासातला असायला हवा ह्याची काळजी घ्या . Administrator भूमिका असलेला यूजर प्लगइन इंस्टॉल करू शकतो . थीम मध्ये बदल करू शकतो . कंटेंट डिलीट करू शकतो किंवा दुसऱ्या यूजर ला सुद्धा डिलीट करू करू शकतो . 

2. Editor 

Editor भूमिका असलेला यूजर हा त्याच्या पोस्ट अॅड , एडिट किंवा डिलीट आणि पब्लिश करू शकतो . आणि हेच काम तो दुसऱ्या यूजर च्या पोस्ट सोबत सुद्धा करू शकतो . तसेच त्याला वेबसाइट च्या सेटिंग , थीम आणि प्लगइन आणि अनेक फीचर कंट्रोल करायचा हक्क असतो . 

3. Author 

Author भूमिका असलेला यूजर हा त्याच्या पोस्ट अॅड , एडिट किंवा डिलीट आणि पब्लिश करू शकतो. परंतु हेच काम तो दुसऱ्या यूजर चे नाही करू शकत . तसेच तो प्लगइन , थीम सेटिंग ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल नाही करू शकत. 

4. Contributor 

Contributor भूमिका असलेला यूजर हा त्याच्या पोस्ट अॅड , एडिट करू शकतो परंतु तो त्याच्या पोस्ट पब्लिश नाही करू शकत . आणि तो बाहेरून काहीच मीडिया अपलोड नाही करू शकत . फक्त तो मीडिया लायब्ररी मध्ये असलेल्या मीडिया च्या वापर करू शकतो . 

5. Subscriber

Subscriber भूमिका असलेला यूजर हा पोस्ट अॅड आणि एडिट ह्या दोन्ही गोष्टी नाही करू शकत . तुम्ही जर कोणती प्रीमियम गोष्टी Subscriber ल देत असाल तर तुम्ही काही प्लगइन च्या मार्फत त्या गोष्टी subscriber साठी उपलब्ध करू शकता .  

वर्डप्रेस मध्ये नवीन यूजर कसा जोडावा ? | How To Add New User In WordPress In Marathi

How To Add New User In WordPress In Marathi

ह्या साठी तुम्हाला फक्त वर्डप्रेस च्या डशबोर्ड मधील User -> Add New वर जाऊन क्लिक करायचे आहे . त्या नंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपेन होईल . व तो फॉर्म भरल्या नंतर तुम्ही सहज तुमच्या वर्डप्रेस वेबसाइट साठी एक नवीन यूजर जोडू शकता .

How To Add New User In WordPress In Marathi

 ह्या फॉर्म मध्ये सर्व प्रथम तुम्हाला यूजर नेम टाकायचे आहे . व त्या नंतर तुम्हाला ईमेल सुद्धा टाकायचा आहे . तुम्ही इथे जो ईमेल टाकाल . यूजर फक्त त्याच ईमेल ने किंवा यूजरनेम ने वर्डप्रेस च्या डशबोर्ड मध्ये लॉगिन करू शकता. एक तुम्हाला मी टीप सुद्धा देतो की जे यूजरनेम टाकत आहात ते विचार करून टाका कारण तुम्हाला जर यूजरनेम मध्ये नंतर बदल करायचे असतील तर तुम्ही ते सहज सहजी नाही करू शकता . त्यामुळे जो ईमेल टाकलाय तो परत एकदा पडताळून घ्या . 

कारण हा ईमेल चा वापर यूजर जेव्हा पासवर्ड विसरेल किंवा नोटिफिकेशन साठी करणार आहे . त्या नंतर तुम्हाला पहिली नाव , शेवटचे नाव आणि वेबसाइट ची url  टाकायचे आहे . ह्या गोष्टी ऑप्शनल मध्ये येतात त्यामुळे ह्या गोष्टी ने टाकल्या तरी चालते . आणि यूजर ल हवे तेव्हा तो ह्या प्रोफाइल एडिट करू शकतो . आता पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे . मी तुम्हाला थोडा कठीण पासवर्ड ठेवण्याचा सल्ला देईन . व तुम्ही Generate Password ह्या बटन वर क्लिक केले तर तुमचा स्ट्रॉंग पासवर्ड आपोआप बनून जाईल .

How To Add New User In WordPress In Marathi

 व खाली तुम्हाला चेकबॉक्स दिसेल तिथे तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्हाला यूजर ला ईमेल द्वारे त्याच्या नव्या अकाऊंट बद्दल माहिती द्यायची आहे का ? तुम्ही जर त्यावर क्लिक केले तर यूजर ईमेल नोटिफिकेशन जाईल व त्या सोबत लॉगिन सुद्धा जाईल व यूजर त्याला हवा तो पासवर्ड सुद्धा ठेवू शकतो . 

How To Add New User In WordPress In Marathi

सर्वात शेवटचा ऑप्शन राहील तो म्हणजे यूजर ची भूमिका निवडण्याचा तुम्ही तुमच्या हिशोबाने हे करू शकता . वरती मी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या यूजर च्या भूमिका असतात व त्याचा अर्थ काय हे सुद्धा सांगितले आहे . यूजर ची भूमिका निवडल्या नंतर तुम्हाला Add New User वर क्लिक करायचे आहे . असा प्रकारे तुम्ही यशस्वी रित्या नवीन यूजर तुमच्या वेबसाइट शी जोडला आहे . 

निष्कर्ष 

ह्या पोस्ट मध्ये आपण वर्डप्रेस मध्ये नवीन यूजर कसा जोडावा ? म्हणजेच How To Add New User In WordPress In Marathi हे जाणून व यूजर च्या भूमिकेचे प्रकार बद्दल ही माहिती घेतली . ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका … 

Leave a Comment

x