रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडावे ? वाचा ……

रेशनकार्ड अर्थात शिधापत्रिका.. तुमच्या ओळखीचा पुरावा. कोणत्याही सरकारी कामासाठी रेशनकार्ड मागितले जातेच. शिवाय, सरकारच्या विविध योजनांचा लाभही रेशनकार्डधारकांना होतो. त्यामुळे प्रत्येकाकडे रेशनकार्ड असणे गरजेचे आहे..!

स्वस्त धान्य असो, वा गॅस जोडणी घ्यायची असो.. जात प्रमाणपत्र काढायचे असो वा अन्य दाखले.. रेशनकार्ड मागितले जातेच. अशा वेळी रेशनकार्डमध्ये तुमचे नाव नसल्यास कामांचा खोळंबा होतो.

रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव तुम्ही सहज जोडू शकता. ( How to add name in ration card online Maharashtra ) त्यासाठी सरकारने ऑनलाइन किंवा ऑफलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. चला तर मग, आपल्या घरातील सदस्याचे नाव रेशनकार्डमध्ये कसे जोडायचे, याबाबत जाणून घेऊ या..

मुलाचे नाव जोडायचे असेल, तर..

रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव जोडायचे झाल्यास मुलाचे जन्म प्रमाणपत्र, सोबत घरातील प्रमुखांचे रेशनकार्ड (फोटोकॉपी आणि मूळ दोन्ही), दोन्ही पालकांचे आधारकार्ड आवश्यक असेल.

पत्नीचे नाव जोडायचे असेल, तर..

लग्नानंतर पत्नीचे नाव रेशनकार्डमध्ये जोडायचे असेल, तर पत्नीचे आधारकार्ड, विवाहाचे प्रमाणपत्र, पतीचे रेशनकार्ड (फोटोकॉपी आणि ओरिजिनल दोन्ही), तसेच पहिल्या पालकांच्या घरच्या रेशनकार्डमधून नाव वगळल्याचा दाखला लागतो.

ऑनलाईन नाव कसे जोडणार..? ( How to add name in ration card online Maharashtra )

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्नपुरवठ्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
    संकेतस्थळावर तुम्हाला लॉगिन आयडी बनवावा लागेल. आधीपासूनच आयडी असेल, तर त्याद्वारे लॉग इन करा.
  • होम पेजवर नवीन सदस्य जोडण्याच्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर नवीन फॉर्म येईल. त्यावर कुटुंबातील नवीन सदस्यांची सर्व माहिती योग्यरित्या भरा.
    फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर नोंदणी क्रमांक दिला जाईल. त्याद्वारे तुम्ही या पोर्टलवर तुमचा फॉर्म ट्रॅक करू शकता.
    अधिकारी फॉर्म आणि कागदपत्रे तपासतील. सगळे काही ठिक असल्यास तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल. पोस्टाद्वारे तुमच्या घरी रेशनकार्ड येईल.

ऑफलाइन नाव असे नोंदवा..

नवीन सदस्याचे नाव नोंदविण्यासाठी जवळच्या अन्नपुरवठा केंद्रात जावे. वर नमूद केलेली कागदपत्रे सोबत ठेवा.
अन्नपुरवठा केंद्रात नवीन सदस्याचे नाव जोडण्याच्या फॉर्मवर सर्व माहिती सविस्तर भरा.

आता कागदपत्रांसह माहिती भरलेला अर्ज अन्नपुरवठा केंद्रात जमा करा. त्यासाठीचे ठराविक शुल्क जमा करावे लागेल. अधिकारी पोचपावती देतील, ती जपून ठेवा. त्याद्वारे ऑनलाइन अर्जाची स्थिती तपासता येते.

अन्नपुरवठा अधिकारी तुमचा फॉर्म तपासतील आणि कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला तुमचे रेशनकार्ड किमान दोन आठवड्यांत घरी येईल..

Leave a Comment

x