नमस्कार मित्रांनो आज आपण वर्डप्रेस वापरणाऱ्या लोकांसाठी FAQ म्हणजेच FAQ About WordPress In Marathi बद्दल चर्चा करणार आहोत . ह्यात आपण नवीन ब्लॉगिंग ला सुरवात करणारी लोकं जेव्हा वर्डप्रेस मध्ये ब्लॉग सुरू करतात तेव्हा खूप साऱ्या प्रॉब्लेम चा सामना करावा लागतो . व असे खूप सारे प्रश्न त्यांच्या मनात असतात. त्याच प्रश्नांची उत्तरे आपण ह्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत .
तर तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये नाही भेटली तर तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून तुमचे प्रश्न मांडू शकता. आम्ही नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरे देण्याची प्रयत्न करू . तर चला सुरू करूया ……..
वर्डप्रेस बद्दल काही FAQ | FAQ About WordPress In Marathi
1. वर्डप्रेस वर ब्लॉग कसा सुरू करावा ?
उत्तर – जर तुम्हाला वर्डप्रेस वर ब्लॉग सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुमच्या कडे एक वेब होस्टिंग व त्या सोबतच एक डोमेन असणे सुद्धा गरजेचे आहे . खूप सारे लोक वेब होस्टिंग निवडताना चुकी करतात व त्या नंतर भविष्यात त्यांना खूप साऱ्या प्रॉब्लेम ना सामोरे जावे लागते . त्यामुळे तुमच्या मदती साठी आम्ही एक ब्लॉग लिहला आहे . How To Choose Web Hosting In Marathi ह्याच्या मदतीने तुम्ही एक उत्तम वेब होस्टिंग निवडू शकता. आता प्रश्न येतो डोमेन कुठून घ्यावे .
इंटरनेट वर अश्या खूप डोमेन प्रोवायडर ज्यांच्या कडून तुम्ही डोमेन घेऊ शकता. परंतु डोमेन ही तुमची ओळख आहे . त्यामुळे डोमेन हा उत्तम असणे गरजेचे आहे . त्यामुळे त्यासाठी सुद्धा आम्ही एक ब्लॉग लिहला आहे . How To choose Domain Name for Blog In Marathi त्याच्या मदतीने तुम्ही सहज एक उत्तम डोमेन विकत घेऊ शकता. आता तुम्हाला ह्या दोन्ही विकत घेतल्या नंतर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांन सोबत कनेक्ट करू तुम्ही वर्डप्रेस वर ब्लॉग सुरू करू शकता. ह्याची पूर्ण प्रक्रिया आम्ही how to start blog in wordpress in marathi ह्या ब्लॉग मध्ये दाखवली आहे. ह्याच्या मदतीने तुम्ही सहज वर्डप्रेस वर ब्लॉग सुरू करू शकता .
2. वर्डप्रेस साईट सुरू करण्यासाठी साधारण किती खर्च येतो ?
उत्तर – तसे तर वर्डप्रेस हे फ्री कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टम आहे परंतु ह्याच्या जर तुम्हाला वापर करायचा असेल तर वरती जसे मी सांगितले तसे वेब होस्टिंग व डोमेन असणे गरजेचे आहे. त्यामुळे साधारण तुम्ही 100 $ मध्ये तुमची वर्डप्रेस साईट सुरू करू शकता. व जेव्हा तुम्हाला जास्त गोष्टींची गरज लागते तेव्हा तुम्ही होस्टिंग प्लॅन हा अपग्रेड सुध्दा करू शकता. त्यामुळे सुरवातीला तरी shared होस्टिंग प्लॅन चा वापर करा . हा स्वस्त तर असतोच पण तुमच्या सुरवातीच्या सगळ्या गरजा ह्या प्लॅन मध्ये पूर्ण होतात .
3. वर्डप्रेस साईट च्या माध्यमातून पैसे कसे कमवावे ?
उत्तर – तसे तर वर्डप्रेस साईटवरून पैसे कमावण्याचे भरपुर मार्ग आहेत. परंतु सध्या च्या घडीला लोकं वेबसाईटवर Ads लावून , साईट वरून affliate प्रॉडक्ट विकून अश्या प्रकारे पैसे कमवतात . मी ह्या गोष्टीचा एक स्पेशल पोस्ट लिहण्याचा नक्की प्रयत्न करेन .
4. ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून वर्डप्रेस चांगले आहे की ब्लॉगर ?
उत्तर – हा एक खूप मोठा विषय आहे कारण ब्लॉगर चे सुद्धा काही स्वतःचे असे चांगले फायदे आहे व तोटे सुद्धा तसेच वर्डप्रेस चा सुद्धा आहे . त्यासाठी आम्ही एक स्पेशल पोस्ट लिहली आहे . blogger vs wordpress in marathi ह्या पोस्ट मध्ये आम्ही ब्लॉगर आणि वर्डप्रेस मधला फरक स्पष्ट केला आहे. ही पोस्ट वाचल्या नंतर नक्कीच तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल ह्याची मला खात्री आहे .
5. वर्डप्रेस साईट मध्ये थीम व प्लगइन कसे इन्स्टॉल करावे ?
उत्तर – वर्डप्रेस मध्ये तुम्हाला थीम असुदे किंवा प्लगइन . ह्या मध्ये तुम्हाला खूप सारे पर्याय उपलब्ध आहे. वर्डप्रेस मध्ये 11000+ थीम आणि 50000+ उपलब्ध आहेत . वर्डप्रेस मध्ये थीम इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला डॅशबोर्ड मध्ये Appreance-> Themes-> Add New क्लीक करू तुम्ही थीम ही निवडून मग इन्स्टॉल करू शकता. व प्लगइन इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला डॅशबोर्ड मध्ये Plugins ->Add New वर क्लिक करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हवे ते प्लगइन तुम्ही इन्स्टॉल करू शकता.
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आपण नवीन ब्लॉगर ला असणारे वर्डप्रेस FAQ म्हणजेच FAQ About WordPress In Marathi बद्दल चर्चा केली ह्या मध्ये काही आपण निवडक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला . तर तुम्हाला आणखी काही वर्डप्रेस बद्दल प्रश्न असतील तर तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. व ही पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका……