दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकऱ्यांची संधी, विविध विभागांत बंपर नोकर भरती सुरु, लगेच करा अर्ज..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. सध्या देशभरात विविध ठिकाणी सरकारी नोकरभरती सुरु आहे. विशेष म्हणजे, फक्त दहावी-बारावी पास उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करु शकतात.. या विविध नोकरभरतीच्या अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत.

संबंधित नोकर भरतीसाठीची अधिसूचना पाहून, उमेदवार दिलेल्या प्रोसेसनुसार अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांनी वेळ न दवडता लवकर या भरतीसाठी अर्ज करावेत. सरकारच्या कोण-कोणत्या विभागांत रिक्त पदांसाठी ही नोकर भरती सुरु आहे. त्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल, पात्रता काय व इतर सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

ESIC Recruitment 2022

कर्मचारी राज्य विमा निगम भरती
कर्मचारी राज्य विमा निगम.. अर्थात ‘इएसआयसी'(ESIC Recruitment 2022) मध्ये अपर डिव्हीजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ आणि स्टेनोग्राफर पदांसाठी नोकर भरती सुरु आहे

पात्रता- दहावी-बारावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
इथे करा अर्ज- esic.nic.in
अर्ज करण्यासाठी मुदत- 15 फेब्रुवारी 2022

नवोदय विद्यालय समिती भरती (NVS Recruitment 2022)
या पदांसाठी भरती
– नवोदय विद्यालय समितीमध्ये गट अ, ब आणि क पदांसाठी भरती
पात्रता – दहावी पास ते पदवीधर उमेदवार असावा.
इथे करा अर्ज – navodaya.gov.in
अर्जासाठी मुदत – 10 फेब्रुवारी 2022.

‘बीएसएफ’ कॉन्स्टेबल भरती (BSF Recruitment 2022)
सीमा सुरक्षा दलात (BSF) 2788 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती.
पात्रता– दहावी उत्तीर्ण किंवा ‘आयटीआय’मध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा ते पदवीधारक व 2 वर्षांचा अनुभव
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 1 मार्च 2022.

पात्र उमेदवारांना दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. नोकर भरतीबाबत सविस्तर माहिती संबंधित वेबसाईटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी त्या त्या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती जाणून घ्यावी..

Leave a Comment

x