Domain Name म्हणजे काय ? त्याचे प्रकार

 नमस्कार मित्रांनो, आज आपण डोमेन नाव म्हणजे काय म्हणजेच domain meaning in marathi हे जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण ब्लॉगिंगच्या क्षेत्रात प्रवेश करता तेव्हा आपण डोमेन, होस्टिंग किंवा एसइओ सारख्या बर्‍याच गोष्टी ऐकायला मिळतात परंतु आपल्याला या सर्व गोष्टी समजत नाहीत कारण आपल्याकडे ब्लॉगिंगचा अनुभव नाही. पण या पोस्टमध्ये मी तुम्हाला डोमेन म्हणजे काय म्हणजेच domain meaning in marathi , ते कसे काम करते आणि डोमेन चे प्रकार म्हणजेच Types of domain in marathi याविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.

डोमेन म्हणजे काय ? | Domain Meaning In Marathi 2021

डोमेन म्हणजे काय ? | domain meaning in marathi

Domain Meaning In Marathi


डोमेन हे तुमच्या वेबसाइट साठी ऍड्रेस प्रमाणे काम करते . इंटरनेट वर खूप साऱ्या वेबसाइट आहेत त्यामुळे त्या वेबसाइट पर्यंत पोहचण्यासाठी डोमेन नेम हि त्याची ओळख प्रमाणे काम करते . जसे आपल्या घराला एक विशिष्ट पत्ता आहे . आपल्या एरिया ला एक वेगळा पिनकोड किंवा नावाच्या स्वरूपाने एक वेगळी ओळख आहे त्या मुळे जर कोणाला आपले घर शोधायचे असल्यास तो गूगल मॅप मध्ये आपल्या घराचा पत्ता टाईप करून समोरचा माणूस आपले घर सहज शोधू शकतो.

डोमेन नेम चे सुद्धा दोन पार्ट आहेत जसे कि marathijeevan.com मध्ये marathijeevan हे आमच्या वेबसाईट चे नाव म्हणजे आमची ओळख आहे आणि .com हे एक्स्टेंशन आहे .

इंटरनेट हे एक मोठे माध्यम आहे व ह्यला सर्व कॉम्पुटर एकमेकांना जोडले गेले आहेत व प्रत्येक वेबसाईट किंवा कॉम्युटर ला एक IP म्हणजे एक वेगळी ओळख आहे जसे कि १२.३४५.६७. ८ . आता तुम्हीच विचार करा कि सगळ्या कॉम्पुटर किंवा वेबसाईट चे नंबर आपल्याला लक्षात तरी राहतील का ? त्यामुळे ह्या प्रॉब्लेम वर सोलुशन म्हणून डोमेन नाव ह्या गोष्टीचा शोध लागला . त्या मुळे प्रत्येक वेबसाईट ला वेगळे नाव आहे जसे कि मराठीजीवन.कॉम …… त्या मुळे इंटरनेट वर आता कोणती हि वेबसाईट शोधणे सहज शक्य आहे .

डोमेन हे कशा प्रकारे काम करते ?

चला तर मग बघुया डोमेन हे नक्की कशा प्रकारे काम करते जेव्हा तुम्ही तुमच्या वेब ब्राऊजर मध्ये डोमेन नेम नेम सर्च करता तेव्हा ती रिक्वेस्ट डायरेक्ट सर्वर पर्यंत जाते त्यालाच डीएनएस म्हणजेच डोमेन नेम सिस्टीम असे म्हणतात त्यानंतर तुम्ही ज्या डोमेन बद्दल रिक्वेस्ट पाठवली आहे त्या सर्वर मध्ये स्टोर असलेले आयपी एड्रेस म्हणजेच डोमेन चे नाव तिथे शोधले जाते व तुम्हाला त्याच्या रिझल्ट म्हणून तुम्हाला ती वेबसाईट दिसते.

उदाहरणार्थ जर तुमची वेबसाईट की होस्टींगर ह्या होस्टिंग प्रोव्हायडर मार्फत होस्ट केली आहे तर त्याचे नेम सर्वर ची माहिती हि अश्या प्रकारे असेल ( ns1.hostinger.cm , ns2.hostinger.com ) ही अशाप्रकारे असेल हे नेम सर्वर होस्टिंग कंपनीमार्फत मॅनेज केले जातात. तुमची होस्टिंग कंपनी तुमची रिक्वेस्ट तुमच्या वेबसाईट पर्यंत पाठवते .. त्या कॉम्पुटर ला वेब सर्वर असे म्हटले जाते अशाप्रकारे डोमेन हे तुमच्या वेबसाईट साठी काम करते.

नक्की वाचा – Retirement Wishes In Marathi

डोमेन नेम चे प्रकार | Types of domain in marathi

Domain Meaning In Marathi


डोमेन नेम हे खूप सार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सटेन्शन मध्ये उपलब्ध असते जसे की .com , .in , .org आणि असे अनेक तर चला मग वेगवेगळ्या प्रकारच्या डोमेन नेम बद्दल डिटेल मध्ये माहिती घेऊया.

  1. टॉप लेवल डोमेन ( TLD )

टॉप लेवल डोमेन मध्ये खूप सारे डोमेन एक्सटेन्शन येतात. हे डोमेन नेम मध्ये सर्वात उच्चस्तरीय डोमेन एक्स्टेंशन आहेत . असे खूप सारे डोमेन नेम आहेत जसे की .com, .net, .org परंतु .com हे त्यामधील सर्वात प्रसिद्ध असे टॉप लेवल डोमेन आहे .

  1. कंट्री कोड टॉप लेवल डोमेन ( ccTLD )

कंट्री कोड टॉप लेवल डोमेन यामध्ये जे डोमेन एक्सटेन्शन आहेत ते एका विशिष्ट कंट्री साठी बनलेले आहेत जसे की .uk हे युनायटेड किंग्डम साठी .in हे इंडिया साठी . हे डोमेन वापरणारी लोक आपल्या कंट्री मध्ये असणाऱ्या लोकांना फोकस करत असतात

  1. स्पॉन्सर टॉप लेवल डोमेन ( sTLD )

स्पॉन्सर टॉप लेवल डोमेन हे डोमेन नेम एका विशिष्ट कम्युनिटी साठी बनलेले डोमेन नाव आहे जसे की एज्युकेशन किंवा त्याच्या रिलेटेड असणारा ऑर्गनायझेशन साठी हे .edu हे एक्स्टेंशन काम करते किंवा गव्हर्मेंट रिलेटेड वेबसाइटसाठी .gov हे एक्स्टेंशन काम करते .

डोमेन बद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ about domain in marathi

Domain Meaning In Marathi


  1. सब डोमेन म्हणजे काय ? | sub domain meaning in marathi

उत्तर – सब डोमेन हे मुख्य डोमेन साठी त्याचे चाइल्ड डोमेन म्हणून काम करते एकदा तुम्ही तुमचे मुख्य डोमेन रजिस्टर केल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवे तेवढे त्याचे सब डोमेन बनवू शकता .

  1. उत्तम डोमेन कसे निवडावे ?

उत्तर – आपल्या वेबसाईट साठी किंवा ब्लॉग साठी उत्तम डोमेन कसे निवडावे हा प्रश्न खूप लोकांच्या मनात आहे. ब्लॉगसाठी किंवा वेबसाईटसाठी डोमेन निवडताना खूप सार्‍या बाबींचा विचार करावा लागतो त्यामुळे यासाठी आम्ही एक स्पेशल ब्लॉन लिहला आहे हा ब्लॉग वाचून तुम्ही नक्कीच तुमच्या वेबसाईट साठी एक उत्तम डोमेन निवडू शकता

  1. वेबसाईटचे डोमेन बदलू शकतो का ?

उत्तर – नक्कीच तुम्ही तुमच्या वेबसाईटचे डोमेन किंवा होस्टिंग तुम्हाला हवे तेव्हा चेंज म्हणजेच बदलू शकत.

  1. विकत घेतलेले डोमेन हे विकू शकतो का ?

उत्तर – हो नक्कीच तुम्हाला जर तुम्ही रजिस्टर केलेले डोमेन विकायचे असेल तर गुगल वर खूप सारे असे प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही तुमचे रजिस्टर डोमेन चांगल्या किंमतीमध्ये विकू शकत

  1. डोमेन नेम किती किमतीमध्ये विकत घेऊ शकतो ?

उत्तर – हे सांगणे थोडे अशक्य आहे कारण इंटरनेटवर असे खुप सारे डोमेन प्रोव्हायडर आहेत जे डोमेन विकतात परंतु प्रत्येकाची किंमत ही वेगळी असल्याने परफेक्ट अशी किंमत सांगणे थोडे अशक्यच आहे परंतु तुम्ही जर नेम चीप किंवा गो डॅडी वरून डोमेन नेम विकत घेतात तर डॉट कॉम किंवा डॉट इन एक्स्टेंशन सोबत तुम्हाला ५०० ते १००० रुपयापर्यंत एका वर्षासाठी डोमेन मिळू शकते.

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण डोमेन नेम म्हणजे काय म्हणजेच domain meaning in marathi त्याचे कोणते व किती प्रकार आहेत म्हणजेच Types of domain in marathi व डोमेन हे कशाप्रकारे काम करते व डोमेन बद्दल लोकांच्या मनात असणारे प्रश्नांची उत्तरे आपण या ब्लॉग मध्ये दिली आहेत या ब्लॉगच्या मार्फत तुमच्या मनात डोमेन म्हणजेच domain meaning in marathi बद्दलच्या शंका नक्कीच दूर होतील अशी मी आशा करतो तुम्हाला या पोस्ट बद्दल किंवा या वेबसाईट बद्दल काहीही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका व आपल्या मित्रांना ही पोस्ट नक्कीच शेअर करा.

Leave a Comment

x