आधारकार्डवरील फोटो बदला 5 मिनिटात …… नक्की वाचा

प्रत्येकासाठी आता आधारकार्ड बनविणं हे अनिवार्य आहे, कारण प्रत्येक सरकारी कामासाठी आधारकार्डची गरज पडतेच. त्या दृष्टीने नागरिकांच्या ओळखीसाठी आधारकार्ड अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज आहे.

दरम्यान, अनेकांच्या आधार कार्डावरील फोटो व्यवस्थित प्रिटींग झालेले नाहीत. त्यामुळे काहींना आपल्या आधारकार्डवरील फोटो आवडत नाही. त्यावरुन सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायरल होत असतात. आधार कार्डवरील फोटोंची खिल्ली उडविली जाते.

आधारकार्डवरील माहिती, म्हणजेच नाव, मोबाईल नंबर, पत्ता वा फोटो प्रत्येकाला बदलता येतो. मात्र, फक्त पत्ता बदलण्यासाठी ऑनलाईन सुविधा आहे, मात्र नाव, मोबाईल नंबर, जन्म तारीख, ई-मेल आयडी, फोटो बदलण्यासाठी ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज कारावा लागतो.

आधार कार्डावरील फोटो आवडत नसेल आणि तो बदलण्याची तुमची इच्छा असेल ( change photo on aadhar card ) , तर ते शक्य आहे. त्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. मात्र, फोटो अपडेट करण्याची प्रक्रियाही ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करावी लागेल.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार कार्डवरील फोटो बदलण्याची परवानगी देते. हा फोटो बदलण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, त्यासाठी किती खर्च येईल, त्याची प्रक्रिया कशी असते, याबाबत जाणून घेऊ या..

कसा बदलणार आधारकार्डवरील फोटो..? | change photo on aadhar card

  • सुरुवातीला uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा. तिथे ‘Get Aadhaar’ सेक्शनवरमध्ये जाऊन आधारकार्ड अपडेटचा फॉर्म डाऊनलोड करा.
  • नंतर हा फॉर्म भरून जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर हा फॉर्म जमा करा.
  • आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स घेतील. त्यात तुमच्या बोटाचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि चेहरा पुन्हा एकदा कॅप्चर केला जाईल.
  • फोटो अपडेट करण्याचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर लगेच तुम्हाला यूआरएन किंवा अपडेट रिक्वेस्ट मोबाईलवर येईल.
  • आधार केंद्रावरील कर्मचारी शुल्क स्वरुपात 25 रुपये + जीएसटीची रक्कम घेऊन तुमचा फोटो अपडेट करतील.
  • आधारकार्ड अपडेट झाल्यानंतर नवीन फोटोसह तुम्ही अपडेटेड आधार कार्ड UIDAI च्या वेबसाइटवर डाउनलोड करू शकता.
  • किंवा पुढच्या 90 दिवसांत तुम्हाला नव्या फोटोसह नवं आधारकार्ड पोस्टाने मिळेल.

Leave a Comment

x