BSNL मध्ये नोकरीची संधी, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार भरती

BSNL Recruitment: भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited, BSNL) महाराष्ट्र येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

बीएसएनएलतर्फे एकूण ५५ जागांसाठी भरती (BSNL Recruitment 2021) होणार असून डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice)ची पदे भरली जाणार आहेत. या अंतर्गत अमरावती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर,नागपूर , अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती होणार आहे. अप्रेंटिस प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे.

Leave a Comment

x