मुंबई महापालिकेत विविध पदांवर भरती …… 45 हजार पगार !

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेत नोकरी ( bmc recruitment 2021 ) करण्यासाठी इच्छूक असलेले उमदेवार ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करु शकतात.

अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचणं आवश्यक आहे. मुंबई महापालिकेकडे ( bmc recruitment 2021 ) अर्ज दाखल करण्यासाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कोणत्या पदांसाठी भरती
मुंबई महापालिकेत कंत्राटी तत्वावर समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

पात्रता
समाज विकास अधिकारी पदासाठी उमेदवार समाजकार्य अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य अभ्यासक्रमाची पदवी घेतेलेली असणं आवश्यक आहे. सहायक समाज विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावारांनी देखील समाज कार्य पदवी अभ्यासक्रमाची पदवी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 20 वर्षांहून अधिक काळ अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज कसा करायचा?
समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार सेवानिवृत्त असणं आवश्यक आहे. समाज विकास अधिकारी आणि सहायक समाज विकास अधिकारी पदासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक आहे. मुंबई महापालिकेत ऑफलाईन पद्धतीनं अर्ज जमा करायचा आहे. समाज विकास अधिकारी पदासाठी उमेदवारांना 45 हजार रुपये पगार तर सहायक समाज विकास अधिकारी पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना 35 हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

Leave a Comment

x