2021 मधले 10 Profitable ब्लॉगिंग Niche Ideas

 नमस्कार मित्रांनो ह्या आधीच्या पोस्ट मध्ये आपण ब्लॉगिंग विषय कसा निवडावा ?  ह्या बद्दल सविस्तर जाणून घेतले .आज मी तुम्हाला १0 असे काही ब्लॉगिंग विषय म्हणजेच blogging niche ideas in marathi देणार आहे . जे फायदेशीर तर आहेतच . पण ह्या विषयांच्या आधारे तुम्ही ब्लॉगिंग ची सुरवात करून त्या मध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकता . 

Blogging Niche Ideas In Marathi

मी जे काही १0 ब्लॉगिंग विषय म्हणजेच blogging niche ideas in marathi देणार आहे त्यातला तुमच्या आवडीचा व सोईस्कर विषय निवडून तुम्ही ब्लॉगिंग क्षेत्रात पहिले पाऊल टाकू शकता . तर चला त्या विषयांबद्दल जाणून घेऊया .

10 ब्लॉगिंग विषय जे तुम्हाला करू शकतात यशस्वी |  Blogging Niche Ideas In Marathi 2021

1. ऑनलाईन पैसे कमवा | earn online money

तुम्ही आयुष्यात एकदा तरी हे नक्कीच गुगल वर सर्च केलं असेल . असा कोणीच व्यक्ती नाही आहे ज्याला घर बसल्या ऑनलाईन पैसे कमवायचे नाही आहेत . त्या मुळे अश्या लोकांसाठी तुम्ही ऑनलाईन पैसे कसे कमवावे ह्या विषयावर ब्लॉग बनवू शकता . तुम्ही सुद्धा ब्लॉगिंग बद्दल अश्याच कोणत्या तरी ब्लॉग वर वाचले असाल . ज्यामध्ये त्याने ब्लॉग कसा बनवावा . ब्लॉगिंग कसे सुरु करावे ह्या बद्दल माहिती दिली असेल . जसा ब्लॉगिंग हा ऑनलाईन पैसे कमवायचा ,मार्ग आहे तसेच युट्युब , डिजिटल मार्केटिंग असे खूप सारे ऑनलाईन पैसे कमवायचे मार्ग आहेत . तुम्ही अश्याच गोष्टीं बद्दल लोकांना तुमच्या ब्लॉग मार्फत माहिती देऊ शकता . ह्या मध्ये तुम्ही तुमच्या ब्लॉग वर जाहिरात किंवा अफिलिएट मार्केटिंगकरून तुमच्या ब्लॉग ला मॉनिटाईझ करू शकता . 

2. आरोग्य व फिटनेस | health and fitness

आरोग्य व फिटनेस हा खूप मोठा विषय आहे . आणि जर तुम्ही ह्या विषयात ब्लॉगिंग करत असाल तर नक्कीच तुम्हाला वाचकवर्ग   भेटू शकतो . त्यामुळे आरोग्य व फिटनेस ह्या ब्लॉगिंग मधील एक प्रसिद्ध असा विषय आहे . हा विषय जास्त प्रसिद्ध असल्यामुळे ह्या विषयात स्पर्धा सुद्धा तेवढीच जास्त आहे . त्यामुळे ह्या गर्दी मध्ये जर तुम्हाला तुमचे अस्तित्व निर्माण करायचे असेल तर तुम्हाला ह्या विषयाबद्दल जास्त माहिती व आवड असायला हवी . तुम्ही ह्या विषयात वेगळं वेगळ्या डाएट प्रकारांची माहिती देऊ शकता . किंवा फिटनेस साठी लागणारे सर्व व्यायाम प्रकार असे टॉपिक सोबत तुम्ही हा ब्लॉग सुरु करू शकता . ह्या ब्लॉग मध्ये तुमचा वाचक हा तरुण मुलं – मुली , वयोवृद्ध आजी-आजोबा किंवा फिटनेस बद्दल आवड असणारे लोक असणार आहेत . त्यामुळे जर फिटनेस व आरोग्य क्षेत्रात तुमचा काही अनुभव असेल तरच तुम्ही ह्या ब्लॉगिंग विषयात यशस्वी होऊ शकता .

3. चित्रपट रिव्यू | movies review

Blogging Niche Ideas In Marathi

तुम्हाला सगळयांना पण चित्रपट बघायला फरार आवडत असेल . पण कोणता हि चित्रपट बघण्याअगोदर जर तुम्हाला समजला कि तो चित्रपट वाईट आहे कि चांगला तर किती बरं होईल ना . हेच काम चित्रपटाचा रिव्यू ब्लॉग करतो . तुम्हाला तर चित्रपट बघायला व तुम्हाला तो कसा वाटला हे लोकांना सांगावस वाटत असेल तर हा विषय तुमच्या साठीच बनलेला आहे . ह्या मध्ये तुम्हाला चित्रपटाचा तुमचा अनुभव कसा होता हे लोकांना सांगायचं आहे . किती सोप्प काम आहे ना ?  

4. फॅशन | fashion

हा एक प्रसिद्ध व फायदेशीर असा ब्लॉगिंग विषय आहे . तुम्ही जर फॅशन बाबतीत सोशिअल मीडिया वर काही शेयर करायला आवडत असेल तर तुम्ही ह्या विषयासाठी परफेक्ट आहेत . ह्या मध्ये तुम्ही फॅशन संबंधित असणाऱ्या गोष्टीं बद्दल किंवा नवीन बातम्यांबद्दल येथे लिहू शकता . परंतु तुम्हाला जर ह्या विषयात ब्लॉगिंग सुरु करायची असेल तर तुम्हाला ह्या विषयाबद्दल आवड व नवीन शिकण्याची उत्सुकता हवी . 

5. राजकारण | politics

तुम्हाला तर राजकारणामध्ये आवड किंवा उत्सुकता असेल तर तुम्ही राजकारण या विषया सोबत तुमचा ब्लॉग सुरू करू शकता.  यामध्ये तुम्ही राजकीय नेत्यांबद्दल माहिती  किंवा राजकीय क्षेत्रात घडणाऱ्या बातम्या तुम्ही येथे लोकांसोबत शेअर करू शकता.  त्यामुळे तुम्हाला जर या विषयांमध्ये ब्लॉग सुरु करायचा असेल तर तुम्हाला या विषयाबद्दल खोलवर माहिती असायला हवी . कारण कधी तरी तुमचे चुकीचे लिखाण इतरांचे मन ही दुखवू शकते.  त्यामुळे त्या लोकांचाही विचार करून तुम्हाला पोस्ट लिहायचे आहेत.  त्यामुळे तुम्हाला जर राजकारणाबद्दल अजिबात अनुभव नसेल तर या विषयात ब्लॉगिंग करू नका असे माझे वयक्तिक  मत आहे. 

6. गेमिंग आणि टेक्नॉलॉजी | gaming and technology

Blogging Niche Ideas In Marathi

हा एक असा विषय आहे जिथे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता . कारण गेमिंग आणि टेक्नॉलॉजी बद्दल अनेक लोकांना जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते.  त्यामुळे तुम्हाला सुद्धा गेमिंग आणि टेक्नॉलॉजी बद्दल आवड किंवा नवीन शिकायची इच्छा असेल तर तुम्ही हि गेमिंग आणि टेक्नॉलॉजी संबंधित ब्लॉग सुरू करू शकता . यामध्ये तुम्ही तुमचा ब्लॉग जाहिरात ,अफिलिएट  मार्केटिंग या मार्गाद्वारे मोनेटाइज करू शकता . यामध्ये तुम्ही गेमिंग आणि टेक्नॉलॉजी संबंधित असणाऱ्या बातम्या सुद्धा लोकांसोबत शेअर करू शकता . गेमिंग आणि टेक्नॉलॉजी बद्दल असणारी लोकांची उत्सुकता यामुळे तुम्ही या क्षेत्रांमध्ये लवकर यशस्वी होऊ शकतात. 

7. कुकिंग आणि रेसिपी | cooking and recipes

तुम्हाला तर माहितीच असेल लोकांना खाणे व नवनवीन रेसिपी बनवणे या गोष्टींची किती आवड असते . त्यामुळे आपल्याला सुद्धा काहीतरी नवीन रेसिपी बनवायची असेल तर आपण सुद्धा गुगलवर सर्च करतो व त्याद्वारे आपण आपली नवीन रेसिपी बनवतो . जर तुम्हाला सुद्धा स्वयंपाक या विषयात आवड असेल व नवनवीन पदार्थ बनवण्याची किंवा लोकांना त्याबद्दल सांगण्याची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा या विषयात आपला ब्लॉग सुरू करू शकता. 

8. शैक्षणिक | educational

तुम्हाला जर दुसर्यां शिकवणे आवडत असेल किंवा तुमच्याकडे ही कोणती स्कील असेल व लोकांना त्या स्किल बद्दल सांगण्याची किंवा त्यांना शिकवण्याची इच्छा असेल.  तर तुम्ही सुद्धा या विषयात ब्लॉग सुरू करू शकता.  आताचा जमाना हा पूर्णपणे ऑनलाइन झालेला आहे.  त्यामुळे मुलांना कुठलीही गोष्ट शिकायचे असल्यास ते इंटरनेटच्या सहाय्याने शिकतात . त्यामुळे हीच मुले तुमचे वाचक होणार आहेत . त्यामुळे तुम्ही सुद्धा या विषयात तुमचा ब्लॉग अगदी सहज सुरू करू शकता . व जाहिरात किंवा दुसर्‍या अनेक मार्गांनी जसे की तुमचे स्वतःचे कोर्स बनवून ते तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून विकू शकता व तुम्ही शैक्षणिक ब्लॉग च्या साह्याने कमाई करू शकता. 

9. खेळ | sports

 तुम्हाला तर माहितीच असेल आपल्या भारतात क्रिकेट या खेळाचे किती वेड आहे . त्यामुळे दिवसेंदिवस क्रिकेट व्यतिरिक्त अनेक  खेळांची आवड भारतातील माणसांना लागली आहे.  जसे कि  फुटबॉल ,हॉकी, कबड्डी त्यामुळे या विषयात वाचकांची संख्या खूप जास्त आहे . तुम्ही या खेळाबद्दल नवनवीन बातम्या तुमच्या ब्लॉग वर लिहू शकता.  किंवा खेळांचे महत्त्व ,खेळांमुळे होणारा फायदा या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहू शकतात व जाहिरातीद्वारे किंवा खेळांचे प्रॉडक्ट तुमच्या ब्लॉगद्वारे विकून  तुम्ही खेळ या विषयाच्या ब्लॉग मधून कमाई करू शकता.

10. प्रवास | travel

Blogging Niche Ideas In Marathi

 तुम्हाला जर प्रवासाची आवड असेल व तुम्ही ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणाबद्दल माहिती गोळा करण्याची व ती माहिती लोकांना सांगण्याची इच्छा किंवा आवड असेल . तर हा विषय तुमच्यासाठीच बनलेला आहे.  प्रवास करणारे अनेक लोक त्या ठिकाणांवर जाण्याआधी त्या ठिकाणाबद्दल जाणून घेण्यासाठी आतुर असतात.  जसे की तिथे कसे जावे ? तिथे बघण्यासारखे काय आहे ? किंवा तिथे राहण्याची सोय आहे का असे खूप सारी शंका लोकांच्या मनात असते.  तुम्हाला जर प्रवासाची आवड असेल व तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणांची माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉग वर टाकत असाल तर.  खूप कमी वेळात तुम्ही तुमचा मोठा चाहता वर्ग निर्माण करू शकता.  कारण खूप काही अशीसुद्धा लोक आहेत.  ज्यांना खूप साऱ्या ठिकाणी जायला जमत नाही परंतु ते वाचनाच्या साह्याने त्या ठिकाणाबद्दल जाणून घेतात . त्यामुळे तुम्ही या ब्लॉगवर जाहिरात किंवा प्रवासासाठी लागणारे साहित्य तुमच्या ब्लॉगवर विकून तुम्ही ह्या ब्लॉगच्या साह्याने कमाई करू शकता. 

निष्कर्ष ( Conclusion )

ह्या ब्लॉगमध्ये मी ज्या काही १० ब्लॉगिंग विषयांबाबत म्हणजेच blogging niche ideas in marathi बद्दल माहिती दिली आहे.  त्या विषयांमध्ये तुम्ही अगदी सहज तुमचा ब्लॉग सुरू करून त्या ब्लॉग पासून कमाई सुद्धा सुरू करू शकता . मी ह्या दहा ब्लॉगींग विषयांबाबत म्हणजेच blogging niche ideas in marathi बद्दल तुम्हाला सांगितले या विषयांवर वाचकवर्ग मोठा आहे . त्यामुळे या विषयात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला फार काळ लागणार नाही.  असेच खूप सारे ब्लॉगिंग विषयांबद्दल मी पुढे हि पोस्ट लिहिणार आहे . 

तुम्हाला जर ब्लॉगिंग संबंधित काही शंका किंवा ब्लॉगिंग विषयाबाबत अश्याच नव नवीन पोस्ट हव्या असल्यास तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करून आम्हाला सुचवू शकता . व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका . लवकरच भेटू एक नव्या विषया सोबत ….. 

Leave a Comment

x