नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करण्याचा विचार करत आहे परंतु कोणते प्लॅटफॉर्म निवडावे यात तुम्हाला शंका आहे तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहे यामध्ये आम्ही ब्लॉगर आणि वर्डप्रेस म्हणजेच blogger vs wordpress या 2 प्लॅटफॉर्म मध्ये फरक तुम्हाला सांगणार आहोत ह्या पोस्टमुळे ब्लॉगिंगसाठी प्लॅटफॉर्म निवडताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडथळे किंवा शंका येणार नाही ह्यची आम्हाला खात्री आहे.
ब्लॉगिंगसाठी प्लॅटफार्म निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा ?
वर्डप्रेस काय आहे ? | what is wordpress in marathi
वर्डप्रेस हे एक मोफत व ओपन सोर्स ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. वर्डप्रेस ची स्थापना ही 27 मे 2003 रोजी झाली. वर्डप्रेस हे एक असे प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला वेबसाईट ,ब्लॉग आणि ऑनलाइन स्टोअर बनवण्यासाठी मदत करते . इंटरनेटवरील 38% वेबसाइट या वर्डप्रेस मध्ये निर्माण केलेले आहेत तुम्ही वर्डप्रेस सॉफ्टवेअर हे मोफत मध्ये डाऊनलोड करू शकता आणि तुम्हाला हव्या तेवढ्या वेबसाईट तुम्ही त्यावर बनवू शकता. वर्डप्रेसवर ब्लॉग बनवण्यासाठी होस्टिंग व डोमेन विकत घेणे गरजेचे आहे . डोमेन व होस्टिंग तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ब्लॉग मध्ये वर्डप्रेस इन्स्टॉल करू शकता . तुम्हाला जर वर्डप्रेस मध्ये ब्लॉग बनवायचा असेल तर त्यासाठी काय करावे ? यासाठी आम्ही एक वेगळा ब्लॉग लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करू
ब्लॉगर काय आहे ? | what is blogger in marathi
ब्लॉगर हे एक गूगल चे प्रॉडक्ट आहे हे ब्लॉगर हे पायरा लॅब्स द्वारे निर्माण करण्यात आले आणि ते नंतर 2003 मध्ये गूगल द्वारे खरेदी करण्यात आले. ब्लॉगर हे एक मोफत ब्लॉगिंग सर्विस आहे. ब्लॉगर ही एक अशी ब्लॉगींग सर्विस आहे ज्यात तुम्ही फ्री मध्ये म्हणजेच मोफत मध्ये ब्लॉग निर्माण करू शकता तेही कुठलेही पैसे खर्च न करता त्याच सोबत ब्लॉगर तुम्हाला फ्री मध्ये ब्लॉगस्पॉट सबडोमेन सुद्धा देते यामध्ये तुम्ही कस्टम डोमेन चा सुद्धा वापर करून आपला ब्लॉग बनवू शकता. एकही पैसे खर्च न करता तुम्हाला जर ब्लॉग बनवायचा असेल तर ब्लॉगर हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
वर्डप्रेस व ब्लॉगर मधले फरक | blogger vs wordpress in marathi
1. वापरायला सोपे | Ease of use
ब्लॉगर हे साधे ब्लॉगिंग टूल आहे तिथे तुम्ही तुमचा ब्लॉग अगदी थोड्या मिनिटांमध्ये सुरु करू शकता करू शकता. ब्लॉगर वरती ब्लॉग चालू करण्यासाठी तुम्हाला गुगल अकाउंट ची गरज आहे. अगदी थोड्या स्टेप मध्ये तुमचा ब्लॉग सुरु होतो जसे की ब्लॉगर वेबसाईट वर जा -> गुगल अकाउंट द्वारे साइन इन करा -> क्रियेट न्यू ब्लॉगऑप्शन वर क्लिक करा -> तुमचे डिस्प्ले नेम निवडा -> ब्लॉग टायटल , ब्लॉक ॲड्रेस व थीम निवडा. अगदी थोड्या स्टेप मध्ये तुमचा ब्लॉग सुरु सुद्धा झाला .
ब्लॉगर प्रमाणे वर्डप्रेसवर सुद्धा ब्लॉग बनवणे खूप सोपे आहे तुम्ही घेतलेले डोमेन ॲड करा -> तुमची थिम निवडा व अगदी थोड्या मिनिटात तुमचा ब्लॉग सुरू सुद्धा होईल त्यामुळे सोपे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडायचे झाल्यास ब्लॉगर आणि वर्डप्रेस म्हणजेच blogger vs wordpress हे दोन्ही सुद्धा प्लॅटफॉर्म वापरायाला खूप सोपे आहेत .
2. मालकी | Ownership
ब्लॉगर हे गुगल मार्फत दिले जाणारे मोफत असे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे . साधे ब्लॉग बनवण्यासाठी ब्लॉगमध्ये मुबलक असे फिचर्स उपलब्ध आहेत पण ह्याचे सर्व मालकी हक्क हे गुगल कडे असल्यामुळे त्यांना हवे तेव्हा ते आपले ब्लॉग बंद करू शकतात परंतु वर्डप्रेस मध्ये आपल्याला हवे त्या होस्टिंग वर आपली वेबसाईट आपण चालवू शकतो व आपला ब्लॉग बंद करण्याचे कोणतेच मालकी हक्क हे वर्डप्रेस कडे नसतात. त्या मुळे आपल्या ब्लॉग चे पूर्ण मालकी हक्क आपल्या कडे असल्यामुळे आपल्या हवे तेवढा वेळासाठी आपण वर्डप्रेस वर आपली वेबसाईट चालवू शकतो .
3. नियंत्रण | Control
ब्लॉगर हे फ्री ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असल्यामुळे काही लिमिटेड गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो ब्लॉगर मध्ये खूप कमी प्रमाणात फीचर्स दिलेले आहेत त्यामुळे जर आपल्याला आणखी काही फीचर्स हवे असतील तर ते आपण ब्लॉगर मध्ये नाही चालवू शकत त्यामुळे ब्लॉगर या गोष्टीमध्ये कमी पडतो.
परंतु वर्डप्रेस हे ओपन सोर्स असल्यामुळे आपल्याला हवे तेवढे फीचर्स आपण वर्डप्रेस मध्ये चालू शकता आपण प्लगइनच्या माध्यमातून किंवा थर्ड पार्टी इंटिग्रेशन च्या माध्यमातून खूप सारे फीचर्स आपल्याला वर्डप्रेस मध्ये वापरावयास मिळतात. तुम्हाला जर तुम्हाला कोडींग बद्दल काही ज्ञान असेल तर तुम्ही स्वतःचे असे कस्टम प्लग-इन सहज बनवून वर्डप्रेस मध्ये त्याचा वापर करू शकता त्यामुळे नियंत्रण च्या बाबतीत म्हणजेच blogger vs wordpress वर्डप्रेस हे ब्लॉगर पेक्षा वरचढ आहे.
4. डिझाईन पर्याय | Design Option
ब्लॉगर मध्ये तुम्हाला खूप कमी प्रमाणात टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत आणि या सर्व टेम्प्लेट बेसिक आणि खूप साधे आहेत . ब्लॉगर्स मधल्या थीम या बिल्ट-इन असल्यामुळे तुम्ही त्यामध्ये थोडेफार लेआउट किंवा त्याचे कलर्स बदलू शकता ब्लॉगर मध्ये खूप कमी प्रमाणात टेम्प्लेट उपलब्ध असल्यामुळे डिझाईन च्या बाबतीत तुम्हाला मर्यादांना सामोरी जावे लागते . परंतु वर्डप्रेस मध्ये खूप साऱ्या फ्री थीम्स उपलब्ध आहेत . त्या मुळे डिझाईन च्या बाबतीत म्हणजेच blogger vs wordpress मध्ये सुद्धा वर्डप्रेस वरचढ आहे .
5. सुरक्षा | Security
ब्लॉगर वर तुमची वेबसाईट हि गुगल च्या सर्वर वर होस्ट असल्यामुळे तुम्हाला सुरक्षा च्या बाबतीत ताण घेण्याची गरज नाही . पण वर्डप्रेस हा सेल्फ होस्टेड असल्यामुळे इथे वेबसाईट ची सुरक्षा हि आपल्या वर अवलंबून आहे . परंतु इथे सुरक्षा साठी खूप सारे प्लगइन उपलब्ध आहेत .
6. आधार व मदत | Support & Help
ब्लॉगर हे फ्री प्लॅटफॉर्म असल्यामुळे आपल्याला इथे फार कमी मदत मिळते . खूप कमी कॅम्युनिटी व फोरम ब्लॉगर साठी उपलब्ध आहेत . परंतु वर्डप्रेस हे ओपन सोर्स असल्या मुळे वर्डप्रेस च्या मदतीसाठी खूप साऱ्या कॅम्युनिटी व फोरम आहेत .
7. भविष्य | Future
ब्लॉगर मधे या एवढ्या काळात खूप कमी अपडेट्स पाहायला मिळाले त्यामुळे ब्लॉगर चे भविष्य हे पूर्णपणे गुगलवर अवलंबून आहे त्यांना हवे तेव्हा ते ब्लॉगर प्लॅटफॉर्म बंद करू शकतात. वर्डप्रेस हे ओपन सोर्स असल्या मुळे ह्याचे भविष्य हे कोणत्या हि व्यक्ती किंवा कंपनी वर अवलंबून नाही आहे . वर्डप्रेस हे खूप जुने व लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे त्या मुळे वर्डप्रेस चे भविष्य हे नक्कीच चांगले असेल .
8. बदल | Portability
ब्लॉगर ची वेबसाइट दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर हलवणे हे खूप अवघड काम आहे तुम्ही तुमची रँकिंग किंवा तुमचे वाचक गमावू शकता. त्यामुळे तुमची मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे . ह्याउलट वर्डप्रेस मध्ये तुम्ही तुमचे डोमेन , होस्टिंग हवे तेव्हा बदलू शकता तेही तुमचा कंटेन्ट न गमावता . त्यामुळे blogger vs wordpress ह्या बाबतीत सुद्धा वर्डप्रेस विजयी झाला असे समजू शकता .
9. खर्च | Pricing
ब्लॉगर हे पूर्णपणे फ्री ब्लॉगींग प्लॅटफॉर्म आहे ब्लॉगर हे तुम्हाला फ्री मध्ये होस्टिंग आणि ब्लॉकस्पोट सबडोमेन फ्री मध्ये देते तसेच थोडेफार थीम्स , गॅजेट्स हे तुम्ही फ्री मध्ये वापरू शकता परंतु तुम्हाला जर कस्टम डोमेन सोबत तुमची वेबसाइट सुरू करायचे असल्यास तुम्हाला डोमेन विकत घ्यावा लागेल त्यामुळे खर्चाच्या बाबतीत ब्लॉगर वर आपल्याला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही परंतु फ्री सोबतीच आपल्याला खूप कमी फीचर्स देतात मिळतात त्यामुळे कुठेतरी आपल्याला ब्लॉगिंग करताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो.
वर्डप्रेस हे सॉफ्टवेअर फ्री आहे परंतु ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला यामध्ये डोमेन व होस्टींग घ्यावे लागते परंतु त्यासोबतच आपल्याला खूप सारे फीचर्स , प्लगइन , थीम यामध्ये मिळतात त्यामुळे ब्लॉगिंग करताना आपल्याला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही व आपले काम खूप सहज होऊन जाते त्यामुळे वर्डप्रेस वापरताना आपल्याला थोडेफार पैसे खर्च करावे लागले तरीही त्याचा आपल्याला खूप सारा फायदा होतो.
निष्कर्ष ( Conclusion )
ह्या ब्लॉग मध्ये आम्ही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडण्यासाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत या सर्व गोष्टी आम्ही सविस्तर पाने स्पष्ट केल्या आहेत व ब्लॉगर आणि वर्डप्रेस म्हणजेच blogger vs wordpress मध्ये असलेले फरक मुद्यां सहीत तुम्हाला सांगितले आहेत त्यामुळे ब्लॉगींग प्लॅटफॉर्म निवडण्यासाठी तुम्हाला या ब्लॉगचा नक्कीच फायदा होऊ शकतो तुम्हाला या पोस्ट बद्दल किंवा या वेबसाईट बद्दल कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. लवकरच भेटू एक नव्या पोस्ट सोबत….