Blogger च्या बेसिक Settings कश्या कराव्या ?

 जर तुम्ही ब्लॉगर वर ब्लॉगिंग सुरू केली असेल तर ब्लॉगर ब्लॉगच्या बेसिक सेटिंग्स करणे गरजेचे आहे . व ह्या मध्ये कोणत्या सेटिंग कश्या कराव्या हे सुद्धा जाणून घ्यावे लागेल . कारण ह्या सेटिंग केल्या शिवाय जर तुम्ही ब्लॉग लिहायला सुरवात केली तर ह्या मुळे ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला खास असा काही फायदा दिसणार नाही . 

blogger basic settings in marathi

कारण जेव्हा तुम्ही ह्या बेसिक सेटिंग करता तेव्हाच गुगल चे crawler तुमच्या ब्लॉग वर येतील व तुमचे ब्लॉग पेज crawl करू शकतील . व तेव्हाच तुमच्या ब्लॉग पोस्ट ह्या सर्च इंजिन मध्ये दिसतील व रॅंक होतील . तर चला ब्लॉगर ब्लॉगच्या बेसिक सेटिंग्स म्हणजेच blogger basic settings in marathi बद्दल जाणून घेऊया …..

ब्लॉगर ब्लॉगच्या बेसिक सेटिंग्स का कराव्या ?

तसे तर ब्लॉग सर्च इंजिन मध्ये रॅंक करणे थोडे कठीणच काम आहे.  परंतु जर तुम्ही मेहनत करतात व ती मेहनत योग्य दिशेने करतात . तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल . जर तुम्ही ब्लॉगर ची बेसिक सेटिंग केली तरच तुमचे पेजेस हे crawl केले जातील व सर्च इंजिन मध्ये रॅंक सुद्धा होते

परंतु त्यासाठी या ब्लॉगर च्या सेटिंग कशा कराव्या हे जाणून घेणे गरजेचे आहे . कारण खूप सारे नवीन ब्लॉगर आहेत ज्यांना याबद्दल माहिती नसते व ते त्यांच्या ब्लॉग च्या बेसिक सेटिंग्स चांगल्याप्रकारे करू शकत नाही

व त्यामुळेच त्यांना ब्लॉगिंगच्या या प्रवासामध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेम ना सामोरे जावे लागते व त्यांना चांगले रिझल्ट मिळत नाहीत कारण त्यांनी त्यांच्या ब्लॉगची बेसिक सेटिंग चांगल्या प्रकारे केलेली नसते. 

आणि जर तुमच्या सोबत ही असच काही होत असेल व तुम्हीसुद्धा ब्लॉगची बसिक सेटिंग केली नसेल तर या पोस्टमध्ये आपण ब्लॉगर ब्लॉगच्या बेसिक सेटिंग्स कशा कराव्या म्हणजेच blogger basic settings in marathi  याबद्दल जाणून घेणार आहोत तर चला सुरु करूया. 

ब्लॉगर ब्लॉगच्या बेसिक सेटिंग्स कशा कराव्या ? | blogger basic settings in marathi

थोड्या दिवसापूर्वी गुगलने ब्राउझर मध्ये नवीन अपडेट आणले आहेत . त्यामुळे ब्लॉगर्सचे इंटर्फेस हे पूर्ण प्रकारे बदलले आहे . त्यामुळे ब्लॉगरचे dashboard हे थोडे वेगळे दिसत आहे . म्हणून आपण नव्या dashboard मधल्या सेटिंग बद्दल जाणून घेणार आहोत. 

सर्वप्रथम तुम्हाला ब्लॉगरच्या डॅशबोर्ड मध्ये लॉगिन करायचे आहे व त्यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या सेटिंग या बटन वर क्लिक करायचे आहे.  सेटिंग वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन सुरू होतील .  त्यामध्ये तुम्हाला बेसिक असे वाचायला मिळेल व त्याखालील सर्व सेटिंग्स आपल्याला करायच्या आहेत . 

Title 

यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला टायटल वर क्लिक करायचे आहे व यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉगचे नाव टाकायचे आहेत जर समजा माझे डोमेन हे मराठीजीवन.कॉम तर तिकडे माझे नावे मराठी जीवन असे येईल व त्यानंतर सेव्ह या बटन वर क्लिक करायचे आहे. 

Description

यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन या बटन वर क्लिक करायचे आहे . यामध्ये तुम्हाला 500 शब्दांच्या मध्ये तुमच्या ब्लॉग बद्दल माहिती लिहायचे आहे.  यामध्ये तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे किवर्ड सुद्धा ॲड करायचे आहे . 

Blog language

यानंतर तुम्हाला ब्लॉक लॅंगवेज चा ऑप्शन दिसेल यामध्ये तुम्हाला क्लिक करून तुमच्या ब्लॉगची भाषा निवडायची आहे . जर तुम्ही तुमचे ब्लॉग हे मराठी मध्ये लिहीत असाल . तर तुम्हाला मराठी भाषा निवडायची आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लॉगची भाषा निवडू शकता. 

Google Analytics Property ID

 यानंतर तुम्हाला Google Analytics Property ID चा ऑप्शन मिळेल . यामध्ये तुम्हाला गुगल अनॅलिटिक्स चा ID टाकून सेव बटन वर क्लिक करायचे आहे. 

Favicon

यानंतर तुम्हाला Favicon चा ऑप्शन मिळेल . जर तुम्ही सर्च इंजिनमध्ये कधी काही सर्च केला असेल तर तुम्हाला वेबसाईट च्या नावाच्या समोर एक लोगो दिसत असेल त्यालाच Favicon असे म्हणतात. 

Privacy

ह्या नंतर तुम्हाला Privacy चा ऑप्शन दिसेल .  Privacy च्या खाली तुम्हाला Visible to search engines या बटन वर क्लिक करून ते enable करायचे आहे .

Publishing

ह्या नंतर तुम्हाला पब्लिशिंग चा ऑप्शन दिसेल . यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा ॲड्रेस दिसत असेल . जर तुम्ही तुमच्या ब्लॉगला कस्टम डोमेन ऍड केलं नसेल तर तुम्ही इथून कस्टम डोमेन ऍड करू शकता . कस्टम डोमेन ऍड  केल्यानंतर . तुम्हाला Redirect domain च्या समोरील बटन वर क्लिक करून ते enable करायचे आहे . 

HTTPS

आता पुढील ऑप्शन आहे https यामध्ये तुम्हाला HTTPS availability आणि HTTPS redirect च्या समोरील बटन वर क्लिक करून ते enable करायचे आहे . ह्यामुळे तुमच्या ब्लॉगवर फ्री मध्ये SSL सर्टिफिकेट enable होईल. 

Permissions

यानंतर तुम्हाला परमिशन चा ऑप्शन दिसेल . यामध्ये ब्लॉगच्या author ची माहिती असते . परंतु यामध्ये तुम्हाला काहीच करायचे नाही आहे. 

Posts

परमिशन नंतर तुम्हाला Posts चा ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्हाला Max posts shown on main page यावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या होम पेज वर किती पोस्ट दाखवायचे आहेत ही सेटिंग तुम्ही इथून करू शकता. 

Image lightbox

यानंतर तुम्हाला Image lightbox सेटिंग मिळेल .  जर तुम्ही Image lightbox चा ऑप्शन वर क्लिक करून ते enable करतात.  तर कोणी जर तुमच्या ब्लॉग पोस्ट वर आले व तिथे तुमचे इमेज वर क्लिक केले तरी ती इमेज त्याच्यासमोर ओपन होईल. 

Comments

यानंतर पुढील ऑप्शन आहे कमेंट यामध्ये तुम्हाला कमेंट लोकेशन वर क्लिक करून Embedded करून सेव करायचे आहे व त्यानंतर Who can comment? वर क्लिक करून त्यावर तुमच्या ब्लॉग वर कोण कोण कमेंट करू शकते तर यामध्ये तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील त्यामध्ये तुम्हाला Users with Google Accounts ला निवडायचे आहे व यामुळे कोणी तुमच्या ब्लॉगवर स्पॅम कमेंट करू शकत नाही व त्यानंतर Comment form message मध्ये तुम्ही तुमच्या वाचकांसाठी काही मेसेज लिहू शकता. 

Formatting

 यामध्ये तुम्हाला टाईम झोन वर क्लिक करून तुमच्या भारताचा टाईम सोन (GMT+05:30) India Standard Time – Kolkata निवडायचा आहे व त्यानंतर Date header format वर क्लिक करून तुमच्या ब्लॉगची डेट फॉरमॅट तुम्हाला कशी हवी आहे हे निवडून मग सेव वर क्लिक करायचे आहे. 

Meta tags

यानंतर Meta tags च्या सेटिंग मध्ये जाऊन Enable search description हे तुम्हाला चा enable करायचे आहे  सर्च डिस्क्रिप्शन मध्ये अशा कीवर्ड चा वापर करा जे तुमच्या ब्लॉगला रॅंक करण्यासाठी मदत करतील. 

Crawlers and indexing

यामध्ये तुम्हाला Enable custom robots.txt ला सुद्धा enable करायचे आहे त्यानंत Custom robots.txt वर क्लिक करून XML साईटमॅप टाकून सेव करायचा आहे. 

Enable custom robots header tags

साईट मॅप टाकल्यानंतर त्याच्या खालील Enable custom robots header tags ला तुम्हाला enable करायचे आहे 

Home page tags

blogger basic settings in marathi


त्यानंतर Home page tags मध्ये मी तुम्हाला जो फोटो दिला आहे त्यानुसार तुम्हाला ते ऑप्शन चालू किंवा बंद करून सेव्ह करायचे आहे. 

Archive and search page tags

blogger basic settings in marathi


Archive and search page tags मध्ये सुद्धा तुम्हाला मी ज्याप्रमाणे फोटो दिला आहे त्याप्रमाणे ऑप्शन चालू बंद करून सेव करायचे आहे. 

Post and page tags

blogger basic settings in marathi

Post and page tags च्या ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला मी ज्याप्रमाणे फोटो दिला आहे त्याप्रमाणे तुम्हाला ऑप्शन चालू किंवा बंद करून सेव्ह बटन वर क्लिक करायचे आहे. 

Google Search Console

यानंतर तुमच्या समोर Google Search Console चा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करून तुम्ही Google Search Console च्या पेज वर जाल .  तिकडे तुमची साईट verify करायची आहे . 

Monetization

त्यानंतर पुढील ऑप्शन आहे Monetization . जर तुम्हाला पुढे गुगल अड्सेंस approval मिळाले.  तर Enable custom ads.txt तुम्हाला enable करून Custom ads.txt मध्ये तुम्हाला गुगल अड्सेंस चा कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे व सेव बटन वर क्लिक करायचे आहे.

निष्कर्ष 

या पोस्टमध्ये आपण ब्लॉगर ब्लॉगच्या बेसिक सेटिंग्स म्हणजेच blogger basic settings in marathi बद्दल माहिती जाणून घेतली . या सगळ्या सेटिंग्स झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉग वर उत्तम पोस्ट पब्लिश करून त्या नेहमी अपडेट करत राहायचे आहेत . तरच तुम्ही ब्लॉगिंग मध्ये यशस्वी होऊ शकाल . जर तुम्हाला या पोस्ट किंवा वेबसाईट बद्दल कोणतीही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता व ही पोस्ट तुमच्या ब्लॉग वर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका……

Leave a Comment

x