Blog का Start करावा ? – 10 कारणे

  ब्लॉग हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे . ब्लॉग का एक असा पर्याय आहे जिथे तुम्ही तुमचे मत मांडू शकता . व ह्यातून पैसे सुद्धा कमवू शकता . आपल्याला कोणती गोष्ट समजत नसेल तर आपण गुगल वर सर्च करतो . त्या नंतर गुगल जे आपल्याला परिणाम दाखवते ते ८० टक्के ब्लॉग असतात . त्यामुळे तेव्हा तुम्ही हि कधी विचार नसेल केला कि ब्लॉग मधून सुद्धा पैसे कमवता येतात . ब्लॉग ला तुम्ही एक प्रकारचं वेब जर्नल म्हणू शकता . त्यामुळे ब्लॉग का सुरु करावा म्हणेजच blog ka suru karava ह्यासाठी  मी आज तुम्हाला १० अशी कारणे सांगणार आहे जे तुम्हाला ब्लॉगिंग करण्यासाठी भाग पाडू शकतात . 

Blog Ka Suru Karava

ब्लॉग सुरु करण्यासाठी १० कारणे | Blog Ka Suru Karava ?

१. ज्ञान शेयर करणे 

अशे अनेक ब्लॉग आहेत ज्यांचे ब्लॉग सुरु करण्यामागचे कारण हे ज्ञान शेयर करण्यासाठी आहे . अश्या लोकांना आपल्या कडे असलेले ज्ञान लोकांना सांगण्याची फार इच्छा असते . त्यामुळे ब्लॉगिंग करणारे बहुतांश लोक हे लोकांना माहिती देण्यासाठी किंवा आपल्या कडे असलेले वेगळे ज्ञान लोकांसोबत शेयर करण्यासाठी ब्लॉग सुरु करतात .

२. छंद किंवा लिहण्याची आवड 

बहुतांश लोक हे छंद म्हणून ब्लॉग कडे बघतात काही लोकांना लिहायला फार आवडते ते स्वतः साठी लिहतातपरंतु ब्लॉगिंग मध्ये हेच काम असल्यामुळे प्रॉब्लेम करण्यामागे सुद्धा त्यांचा हा हेतू असू शकतो.  त्यामुळे अशा लोकांमुळे ब्लॉगिंग क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत आहे . ज्या लोकांना लिहायला आवडते त्या लोकांना इंटरनेटवर आपली हक्काची जागा निर्माण करायची असते व अशा लोकांना प्लॅटफॉर्म बद्दल काहीच प्रॉब्लेम नसतो किंवा किती वाचक आपले ब्लॉग वाजतील या सुद्धा गोष्टींची त्यांना फिकीर नसते ते फक्त आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या छंदासाठी लिहीत असतात त्यामुळे अशी लोकं ही ब्लॉगींग कडे वळतात. 

3. नेटवर्किंग 

Blog Ka Suru Karava

ब्लॉग हा नवीन लोकांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्या शी ओळख करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे . तुम्ही जगभरातील किंवा तुमच्याच देशातील इतर लोकांशी ब्लॉक च्या मार्फत संबंध किंवा संपर्क साधू शकता.  ब्लॉगिंग तुम्हाला तुमच्या आयडियाज लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते .  त्यामुळे ब्लॉग लिहित असताना तुमच्या सारखे इतर ब्लॉगर सुद्धा तुमच्याशी ओळख बनवण्यासाठी उत्सुक असतात . त्यामुळे अशा लोकांसाठी कमेंट सेक्शन हे नक्कीच लाभदायक ठरते . कमेंट सेक्शनच्या  माध्यमातून तुम्ही लोकांच्या मते तुमचा ब्लॉक कसा आहे हे जाणून घेऊ शकता . त्यामुळे ज्या लोकांना नवनवीन लोकांशी ओळख करायची आहे असे लोक सुद्धा ब्लॉगींग क्षेत्रात येतात. 

4. डिजिटल जीवनशैली 

तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून डिजिटल जीवन जगू शकता व डिजिटल जीवन जगण्याची संधी तुम्हाला फक्त ब्लॉगींग देऊ शकते.  ब्लॉगिंग तुम्हाला अशा काही संधी देते की तुम्ही कुठून ही तुमचे काम करू शकतात . त्यामुळे ब्लॉगिंग क्षेत्रात तुम्हाला कामाचे स्वातंत्र्य मिळते.  बहुतांश ब्लॉगर हे ब्लॉगच्या माध्यमातून डिजिटल जीवन जगत आहेत . त्यामुळे ब्लॉगिंग मध्ये काम करत असताना तुम्ही प्रत्येक वेळी अपडेट राहता. 

5. प्रसिद्धी 

जेव्हा लोक इतर यशस्वी माणसांना बघता तेव्हा ती लोकं त्यांचा मार्ग अवलंबतात.  जेव्हा आपण लहान होतो तेव्हा क्रिकेटर किंवा इतर व्यक्तींना बघून आपण प्रेरित व्हायचो व मोठेपणी आपल्यालाच असं काहीतरी मोठे करायचे आहे असे मनाशी इच्छा बाळगायचो. जेव्हा मी मोठमोठ्या  कलाकारांचे मूवी बघायचो तेव्हा मला त्यांच्यासारखे बनायचे असे वाटायचे आणि हे सुद्धा ब्लॉगींग क्षेत्रात शक्य आहे जेव्हा आपण ब्लॉग क्षेत्रातील काही यशस्वी लोकांना बघतो तेव्हा आपल्याला ही अशीच प्रसिद्धी , पैसा मिळावा अशी आपली इच्छा असते त्यामुळे बहुतांशी लोक हे प्रसिद्धी साठी ब्लॉगिंग या क्षेत्रात येतात. 

6. पैसे कमावणे 

2021 मध्ये  Blog Ka Suru Karava

ब्लॉगींग क्षेत्रात काम करणारी बहुतांशी लोक यांचे ध्येय एकच असते की त्यांना बक्कळ पैसा कमवायचा आहे . त्यामुळे त्या लोकांना असं वाटत असते की मी मेहनत न करता हि ब्लॉगिंग मधून  पैसा कमवू शकतो . परंतु हे पूर्णपणे खोटे आहे . त्यामुळे जर तुमची ब्लॉगिंग  मध्ये मेहनत करायची तयारी नसेल . तर तुम्ही ब्लॉगिंग मधून पैसे कमवू  नाही शकत . व पैसे कमावणे हेच फक्त तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही फार काळ ह्या क्षेत्रात काम करू शकत नाही.  कारण ब्लॉगिंग  क्षेत्रात खूप सारे उतार-चढाव येतात . त्यामुळे जर पैसा कमावणे हेच तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही या उतार-चढाव वामुळे खचून ब्लॉगिंग सोडून द्याल .  त्यामुळे बहुतांशी लोक ही पैसे कमावणे यासाठी ब्लॉगिंग क्षेत्रात येतात. 

7. जाहिरात 

बहुतांश कंपनी किंवा मोठे ब्रँड हे ब्लॉगचा वापर त्यांच्या प्रॉडक्ट च्या जाहिरातीसाठी करतात. इंटरनेटवरील युझरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . त्यामुळे युझर  हे जास्तीत जास्त ब्लॉग वाचत आहेत . त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या किंवा मोठमोठे ब्रँड हे ब्लॉगचा वापर त्यांच्या प्रॉडक्टच्या जाहिरात करण्यासाठी करतात . ते त्यांच्या प्रॉडक्ट संबंधित ब्लॉग लिहून युजर्सना त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. 

8. पर्सनल ब्रँड निर्माण करणे

 ब्लॉग तुम्हाला  स्वतःचा पर्सनल ब्रँड निर्माण करण्याची संधी देते . तुम्ही ब्लॉग  लिहून तुमच्या कडे असलेले ज्ञान इतर लोकांना देऊन तुमच्याकडे असलेले वेगळी कला लोकांना दाखवू शकता व जर तुम्ही त्या क्षेत्रातएक्सपर्ट असाल तर पर्सनल ब्रँड निर्माण करणे काही कठीण गोष्ट नाही.  तुम्ही ब्लॉगच्या मार्फत खूप सार्‍या लोकांना रोज तुमच्याशी जोडत असतात . त्यामुळे बहुतांश लोक हि लोक ब्लॉगकडे त्यांच्या पर्सनल ब्रँड निर्माण करण्यासाठी एक साधन म्हणून बघतात. 

9. नोकरी किंवा व्यवसाय 

हे एक असे कारण आहे ज्यामुळे बहुतांश लोक ब्लॉगिंग सुरु करतात . जर तुमच्याकडे कोणते कोणती वेगळी कला असेल तर तुम्ही त्या संबंधित ब्लॉग लिहून किंवा वेबसाइट बनवून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.  ब्लॉगच्या मार्फत तुम्ही खूप सारे क्लायंट निर्माण करू शकता . समजा तुम्ही फोटोग्राफर आहात . तर तुम्ही इमेज किंवा फोटो संबंधित वेबसाइट बनवून.  तुमची कला इतरांना दाखवू शकता व त्या मार्फत तुम्हाला खूप सारे क्लाइंट सुद्धा मिळू शकतात . त्यामुळे जर तुम्ही स्वतःसाठी काम करत असाल तर तुम्ही ब्लॉग च्या मार्फत तुमचा व्यवसाय वाढवू शकता त्यामुळे खूप सारी लोकं ही ब्लॉगिंग कडे एक नोकरी किंवा व्यवसाय म्हणून बघतात . 

10. इतरांना मदत करणे 

Blog Ka Suru Karava

असे खुप सारे ब्लॉगर्स आहेत ज्यांचे ब्लॉगिंग सुरु करण्यास मागचे मुख्य कारण हे इतरांना मदत करणे हे आहे . कारण खूप सारे लोकांनी आपल्या जीवनात अनेक अनुभव अनुभवले आहेत . त्यामुळे आपल्याला जे प्रॉब्लेम आले ते इतरांना येऊ नये म्हणून ही काही लोक ब्लॉग सुरु करतात . त्यामुळे त्याच्या कामाप्रती असलेल्या प्रामाणिकपणा मुळे   असे ब्लॉगर लवकर यशस्वी होतात कारण . अशा ब्लॉगर्सना त्यांना येणाऱ्या ट्रॅफिक किंवा पैसे या गोष्टींशी त्यांना काहीच फरक पडत नाही . त्यांचे उद्दिष्ट फक्त एकच असते की ब्लॉगच्या मदतीने मी इतर लोकांना मदत करू शकेन.  व आपल्या ब्लॉगिंग क्षेत्रात अश्या लोकांची खूप गरज आहे . 

ब्लॉग सुरु करण्याची इच्छा तर खूप लोकांची असते परंतु ब्लॉगिंग सुरु करण्यामागे प्रत्येक माणसाची एक वेगळी गोष्ट किंवा कारण असू शकते . त्यामुळे ह्या पोस्ट मध्ये मी असे १० कारणे सांगितली आहेत ज्याने तुम्ही सुद्धा प्रेरित होऊ लवकरच आपला ब्लॉग सुरु करू शकाल . ब्लॉग का सुरु करावा म्हणेजच blog ka suru karava हे जाणून घेण्यासाठी पोस्ट पूर्ण वाचा . व हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्राला शेयर करायला विसरू नका . 

Leave a Comment

x