भारती विद्यापीठ पुणे येथे पदवीधरांना नोकरीची संधी

Bharati Vidyapith Recruitment:भारती विद्यापीठ पुणे येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. टायपिस्ट (इंग्रजी आणि मराठी), रिसेप्शनिस्ट, ज्युनिअर क्लर्क ही पदे भरली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.

स्टेनो टायपिस्ट पदासाठी उमेदवार पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याला इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. तसेच इंग्रजीमध्ये १०० शब्द प्रति मिनीट आणि मराठीमध्ये शॉर्टहॅण्ड आणि ४० शब्द प्रति मिनीट इतका स्पीड असणे गरजेचे आहे. उमेदवारांना चांगले लिहिणे आणि संभाषण कौशल्य यायला हवे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. कॉम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

रिसेप्शनिस्ट पदासाठी कोणत्याही स्ट्रीममधून पदवी उत्तीर्ण आणि इंग्रजी आणि मराठी भाषेत संवाद साधता येणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण पूर्ण केलेल्यांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराला संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. ३५ शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड आणि कम्युनिकेशन स्कील्स असणे आवश्यक आहे.

ज्युनिअर क्लर्क पदासाठी उमेदवाराकडे पदवी उत्तीर्ण असण्यासोबतच मराठी आणि इंग्रजी भाषेत संवाद साधता येणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराला संबंधित कामाचा ४ ते ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. इंग्रजी ४० शब्द आणि मराठी ३० शब्द प्रति मिनिट इतका वेग असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे एमएससीआयटी आणि टॅलीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Leave a Comment

x