Blogging चे 13 Benefits जे तुम्हाला माहीत नसतील

 नमस्कार मित्रांनो ,तुम्ही ब्लॉगिंग बद्दल तर ऐकलं असेल ? पण जर तुम्हाला  ब्लॉगिंग म्हणजे काय ? हे माहीत नसेल तर हे आर्टिकल अगदी काळजीपूर्वक वाचा.  कारण या पोस्ट मध्ये आज मी तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय व ब्लॉगिंग करण्याचे काय फायदे म्हणजेच benefits of blogging in marathi आहेत हे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे.  तुमच्या मनात ब्लॉगिंग बद्दल ज्या  काही शंका आहेत त्या सगळ्या शंका या पोस्ट वाचल्या नंतर दूर होतील अशी मला आशा आहे . ब्लॉगिंग या क्षेत्राबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे . कारण ब्लॉगिंग या क्षेत्राबद्दल आजपर्यंत कोणीच पूर्ण माहिती दिली नाही . 

Benefits Of Blogging In Marathi

आताही खूप सारे लोक ९ ते ५ या कंटाळवाण्या नोकरी मध्ये अडकले आहेत . ते त्यांच्या नोकरी बद्दल अजिबात खुश नाही आहेत. परंतु त्याच्या कडे काही ऑप्शन सुद्धा नाही आहे .  आणि ते त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या नुसार काम करू शकत नाही . उलट कंपनीने त्यांना जे काम दिले आहे तेच काम ते रोज करतात . त्यामुळे त्यांनी काम कितीही चांगले केले तरी त्यांची प्रशंसा करणारे कोणीच नसते.  कारण जो माणूस  खरा काम करतो त्याला कधीच त्याचे क्रेडिट मिळत नाही . उलट त्याचे क्रेडिट कोणीतरी भलताच माणूस घेऊन जातो.  त्यामुळे नोकरी करण्याची इच्छा तेव्हाच संपलेली असते व या नोकरीमध्ये तुम्हाला कधीच काही नवीन शिकायची संधी मिळत नाही. 

 रोज तेच काम तेच कंटाळवाणे आयुष्य ….  पण जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काम करू शकता व त्या गोष्टीचे तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत.  तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही . परंतु हे खरं आहे / ब्लॉगींग सुरु करण्यापूर्वी ब्लॉगींग क्षेत्राबद्दल थोड्या बेसिक गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.  कारण बहुतेक लोकं ब्लॉग  तर सुरू करतात . परंतु त्यामध्ये ते यशस्वी होत नाही.  त्यामुळे कुठल्याही नवीन गोष्टी बद्दल शिकत असताना . त्या गोष्टी बद्दल पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्या क्षेत्रात कधीच काम करू नका . त्यामुळे आज मी तुम्हाला ब्लॉगिंग चे फायदे म्हणजेच benefits of blogging in marathi सविस्तर पणे समजावून सांगणार आहे . ज्याने तुमच्या मनात कोणत्याच प्रकारची शंका राहणार नाही . तर चला सुरु करूया ….. 

Benefits Of Blogging In Marathi | जाणून घ्या ब्लॉगिंग चे १३ फायदे 

1. आवडीच्या विषयाबद्दल लिहू शकता 

ब्लॉगिंग हे असे क्षेत्र आहे जिथे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाबद्दल रोज लिहू शकता.  कारण ब्लॉगिंग मध्ये तुमच्या स्वतःची हक्काची वेबसाईट असते व त्यावर तुम्ही तुम्हाला हव्या त्या विषयावर लिहू शकता.  हा ब्लॉग तुमच्या हक्काचा असल्यामुळे तेथे तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही . त्यामुळे ब्लॉगिंग तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची सुवर्णसंधी देते . व आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे आपल्याला कधीच कंटाळा येत नाही . उलट आपण ते काम खूप मन लावून करतो . त्यामुळे ब्लॉगिंगचा हा सर्वात मोठा फायदा म्हणजेच benefits of blogging in marathi आहे. 

2. तुम्ही लोकांची मदत करू शकता 

Benefits Of Blogging In Marathi

ब्लॉग हे असे माध्यम आहे ज्यातून तुम्ही खूप सार्‍या लोकांची कळत-नकळत मदत करू शकता.  खूप सारी अशी लोक आहेत ज्यांना ब्लॉगिंग मध्ये सुरुवात करण्यापूर्वी ब्लॉगिंग या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नव्हती.  परंतु खूप वर्षाच्या अनुभवांमुळे ते ब्लॉगिंग या क्षेत्राबद्दल खूप काही शिकले व अशा लोकांनी दुसर्या लोकांना आपल्याला जो त्रास झाला तो दुसऱ्यांना नको व्हावा . म्हणून त्यांनी त्याबद्दल सुद्धा ब्लॉग बनवले . त्यामुळे ज्यांना ब्लॉगिंग बद्दल शिकण्यासाठी जिथे एक वर्ष लागलॆ तिथे त्यांचे वाचक फक्त एक महिन्यात ब्लॉगिंग बद्दल शिकले . त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून कशी लोकांची मदत करू शकता. 

3. तुम्ही एक चांगले लेखक बनू शकता 

जर तुम्ही रोज एक ब्लॉग लिहीत असाल व तुम्हाला लेखनाबद्दल काहीच अनुभव नसेल.  तर तुमच्या रोजच्या लिखाणामुळे तुम्हाला लिखाणाबद्दल भरपूर काही गोष्टी अनुभवता येतील व या रोजच्या चुकांमधून तुम्ही खूप काही शिकाल व दिवसेंदिवस तुमचे लेखन सुद्धा सुधारेल व ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुम्ही एक चांगले लेखक बनू शकता. 

4. तुमची नवीन लोकांशी ओळख होईल

 जेव्हा तुम्ही ब्लॉगिंग सुरु करता तेव्हा तुमची हक्काची एक वेबसाईट असते व त्या वेबसाईटवर रोज हजारो नवीन माणसे भेट देत असतात व त्याच नवीन माणसांसोबत तुमची ओळख होऊ शकते व त्यांच्याकडून किंवा त्यांच्या अनुभवांमधून तुम्ही खूप काही शिकू शकता. 

5. तुम्ही तुमचे प्रोडक्ट विकू शकता 

जर तुम्ही ज्या विषयात काम करत आहात किंवा लिहत आहात.  त्या संबंधित काही तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट असतील.  तर तुम्ही ब्लॉग च्या माध्यमातून ते कस्टमर पर्यंत पोहोचवून त्या प्रॉडक्ट ची विक्री करू शकता . जर तुमच्याकडे स्वतःचे प्रॉडक्ट नसतील तर तुम्ही अफिलिएट मार्केटिंगच्या द्वारे दुसऱ्यांचे प्रोडक तुमच्या ब्लॉग वर लिंक च्या माध्यमातून विकू शकता व तुम्हाला त्याचे पैसे सुद्धा मिळतील. 

6. तुम्ही तुमचा बिजनेस सुरु करु शकता 

जर तुम्ही ब्लॉगींग क्षेत्रात बिजनेस म्हणून सुरुवात करत असाल.  तर तुम्हाला येथे तुमचे टार्गेट कस्टमर मिळू शकतात.  तुम्ही ब्लॉग  द्वारे तुमच्या बिजनेस बद्दल प्रमोशन किंवा जाहिरात करून तुम्ही तुमचे कस्टमर तुमच्या ब्लॉगच्या द्वारे सहज मिळवू शकता .. ब्लॉगिंग हे ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही दुसऱ्या पेक्षा एक पाऊल नेहमीच पुढे राहाल.  त्यामुळे जर तुम्ही ब्लॉगिंग हे  बिझनेस साठी सुरू करत असाल तर तुमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. 

7. अधिकचे पैसे कमवू शकता . 

Benefits Of Blogging In Marathi

जर तुम्ही ब्लॉगिंग हे पार्टटाईम व तुमची नोकरी ही फुल टाइम करत असाल . तर तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून अधिकचे पैसे सहज कमवू शकता . जर तुम्ही दिवसातील थोडा वेळ काढून रोज किंवा आठवड्यातून एक पोस्ट लिहीत असाल व जर तुमच्या वेबसाईटवर  जास्त ट्रॅफिक येत असेल तर तुम्ही जाहिरातच्या माध्यमातून किंवा अफिलिएट मार्केटिंग च्या माध्यमातून सहज अधिकचे पैसे कमवू शकता. 

8. नवीन गोष्टी शिकू शकता 

ब्लॉग सुरु करणे तर सोप्पे आहे परंतु ब्लॉग चालवत असताना भरपूर गोष्टींची गरज तुम्हाला भासते जसे कि SEO , सोशियल मीडिया स्किल इत्यादी . त्यामुळे ब्लॉगिंग करताना ह्या गोष्टी शिकणे गरजेच्या आहेत . व ब्लॉगिंग करत असताना तुम्ही ह्या स्किल सहज शिकून जाता . 

9. फ्री मध्ये ब्लॉग सुरु करू शकता 

तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरु करणे हे आजच्या काळात अगदी सोपे झाले आहे ते हा मोफत . तुम्ही गुगल च्या ब्लॉगर प्लॅटफॉर्म वरून स्वतःचा ब्लॉग बनवू शकता ते हि मोफत . किंवा तुम्ही स्वतःचे डोमेन किंवा होस्टिंग घेऊन वर्डप्रेस वर सुद्धा ब्लॉग बनवू शकता . ते हि परवडणाऱ्या किमतीत . त्यामुळे स्वतःचा मोफत ब्लॉग सुरु करणे हे खूप सहज झाले आहे . 

10. आपल्याला शिस्त लागते 

जर तुम्ही आळशी असाल . व कोणतेच वेळेवर करत नसाल तर ब्लॉगिंग क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला शिस्त हि अंगवळणी पडते . रोज ब्लॉग लिहणे , ब्लॉग पोस्ट करणे , पोस्ट शेयर करणे . ह्या सर्व गोष्टी रोज कराव्या लागतात . जर तुम्ही टाईमटेबल पाळत नसाल तर हे काम करणे कठीण आहे . त्यामुळे ब्लॉगिंग मुले तुम्हाला खूप साऱ्या शिस्त लागतात . 

11. आपला आत्मविश्वास वाढतो 

Benefits Of Blogging In Marathi

ब्लॉगिंग मध्ये काम करत असताना आपण खूप साऱ्या चुका करतो व त्यातून शिकतो सुद्धा . त्यामुळे ह्या चुकांमधून रोज आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात . व ह्या सोबत आपला आत्मविश्वास सुद्धा वाढतो . तुम्ही जे काम करताय त्यावर समोरचा माणूस त्याचे मत मांडू शकतो . त्यामुळे त्याची मते व प्रशंसा आपला जोश वाढवतात . व रोज काही तरी नवीन करण्याची प्रेरणा देतात . 

12. स्वतःचा वाचकवर्ग निर्माण करू शकता 

तुमचा वाचकवर्ग हि ब्लॉगिंग मधील एक महत्वाची बाजू आहे . ज्या लोकांना तुमचे लिखाण आवडते त्या लोकांना तुमच्या नवीन पोस्ट ची प्रत्येकवेळा आतुरता असते . त्यामुळे आपला हि वाचकवर्ग आहे . व तो आपल्या पोस्ट ची आतुरतेने वाट पाहत आहे . हाच क्षण किती सुखद आहे. त्यामुळे प्रत्येक ब्लॉगर साठी त्याचा वाचक हा त्याचा देव असतो . 

13. तुम्ही खुश राहाल

ब्लॉगिंग मधून होणारी कमाई तुम्हाला नक्कीच आनंद देईल परंतु आपण आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून गरजू लोकांची मदत करत आहोत . हाच विचार तुम्हाला प्रत्येक वेळी खुश व रोज नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा देईल . त्यामुळे हे सुख तुम्ही शब्दात नाही मांडू शकत . 

निष्कर्ष ( Coclusion )

ह्या पोस्ट मध्ये आम्ही ब्लॉगिंग चे फायदे म्हणजेच benefits of blogging in marathi स्पष्टपणे सांगितले आहेत . मला आशा आहे कि हि पोस्ट वाचल्या नंतर तुमच्या मनात ब्लॉगिंग बद्दल असलेल्या बहुतेक शंका दूर झाल्या असतील . हि पोस्ट तुमच्या ब्लॉगर मित्रांसोबत शेयर करायला अजिबात विसरू नका . लवकरच भेटू एक नवीन विषयासोबत ….. 

Leave a Comment

x