बँक ऑफ बडोदामध्ये 105 पदांवर भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड ……

 सरकारी बँकेत नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना एक चांगली संधी निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदानं ( bank of baroda recruitment 2022 ) वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि ग्रामीण कृषी बँकिंग विभागासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये 47 अ‌ॅग्री मार्केटिंग ऑफिसर पदासह 105 पदांवर भरती होणार आहे. उमेदवार 27 जानेवारीपर्यंत bankofbaroda.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

bank of baroda recruitment 2022

पदांचा तपशील

हेल्थ वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट:1

वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट:28

गुंतवणूक संशोधन व्यवस्थापक: 2

पोर्टफोलिओ रिसर्च अनालिस्ट : 2

एनआरआय वेल्थ प्रॉडक्टस मॅनेजर :1

उत्पादन प्रबंधक :1

ट्रेड रेग्युलेशन सीनिअर मॅनेजर : 1

उत्पादन प्रबंधक बँक: 1

ग्रुप सेल्स हेड :1

प्रायव्हेट बँकर रेडियंस प्रायव्हेट : 20

अ‌ॅग्रीकल्चर मार्केंटिग ऑफिसर : 47

शैक्षणिक पात्रता:

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारींनी भारत सरकारनं मान्यता दिलेल्या विद्यापीठातून उमेदवार पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तर, पदनिहाय अधिक शैक्षणिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेनं प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अर्जाचं शुल्क

बँक ऑफ बडोदाकडून खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्जाचं शुल्क 600 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवार, महिला आणि दिव्यांग उमेदवारांना 100 रुपये अर्जाचं शुल्क द्यावं लागेल.

वयोमर्यादा:

हेल्थ वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट:31 ते 50 वर्षे

वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट: 24 ते 45 वर्षे

गुंतवणूक संशोधन व्यवस्थापक:23 ते 35 वर्षे

पोर्टफोलिओ रिसर्च अनालिस्ट : 22 ते 35 वर्षे

एनआरआय वेल्थ प्रॉडक्टस मॅनेजर : 26 ते 40 वर्षे

उत्पादन प्रबंधक :24 ते 40 वर्षे

ट्रेड रेग्युलेशन सीनिअर मॅनेजर : 24 ते 40 वर्षे

उत्पादन प्रबंधक बँक: 24 ते 45 वर्षे

ग्रुप सेल्स हेड :31 ते 45 वर्षे

प्रायव्हेट बँकर रेडियंस प्रायव्हेट : 33 ते 50 वर्षे

अ‌ॅग्रीकल्चर मार्केंटिग ऑफिसर : 25 ते 40 वर्षे

ऑनलाईन अर्ज कुठं दाखल करायचा?

पात्र उमेदवारांनी बँक ऑफ बडोदामध्ये पदाच्या भरतीसाठी https://www.bankofbaroda.in/ या वेबसाईटवर अर्ज करावेत.

निवड प्रक्रिया:

बँक ऑफ बडोदा उमेदवारांनी अर्ज सादर करेल्यानंतर त्या अर्जांची पडताळणी करुन उमेदवारांना मुलाखतीला बोलवेल. मुलाखत आणि गटचर्चा या दोन्हीमधून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Leave a Comment

x