मोबाईलद्वारे आता असे नोंदवा मतदार यादीत नाव…..ते ही घरबसल्या !

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ( add name in voting list maharashtra ) आता तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. अगदी घरबसल्या मोबाईलवरुनही तुम्हाला मतदार यादीत नाव नोंदविता येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली..

याबाबत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की “राज्य निवडणूक आयोगाने ‘ट्रू-व्होटर मोबाईल ॲप’ (true voter app) विकसित केलं आहे. या ॲपच्या माध्यमातून विविध सुविधांसह मतदार यादीतील आपले नाव शोधता येणार आहे.”

“तसेच या ॲपमध्ये मतदार यादीत नावनोंदणीचीही ( add name in voting list maharashtra ) सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याद्वारे निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी संकेतस्थळाच्या लिंकद्वारे मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच या अ‍ॅपमध्ये मतदारांच्या नावांत किंवा पत्त्यांतही दुरूस्ती करता येणार आहे..”

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
भारत निवडणूक आयोगातर्फे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या निमित्त 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार याद्या 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. याच मतदार याद्या 2022 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरल्या जाणार आहेत.

‘ट्रू-व्होटर मोबाईल ॲप’च्या माध्यमातून जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी मतदार यादीत नावे नोंदवावित, तसेच नावांत अथवा पत्त्यांत काही बदल करायचा असल्यास या ॲप’च्या माध्यमातून लवकर करावा, असे आवाहन मदान यांनी केले.

Leave a Comment

x